सव्वीस हजार शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी; पालघर-ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:08 AM2020-01-14T00:08:21+5:302020-01-14T00:08:50+5:30
एकूण १५७ कोटी ४१ लाख रुपये मिळण्याचा अंदाज
सुरेश लोखंडे
ठाणे : राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना नुकतीच लागू केली. यामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनाअट माफ केले जात आहे. यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकºयांचा लेखाजोखा काढला जात आहे. त्यानुसार, २५ हजार ८८२ शेतकºयांना १५७ कोटी ४१ लाख पाच हजार ६७७ रुपयांची कर्जमाफी मिळणार असल्याचा अंदाज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यभरातील शेतकºयांना त्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना राज्यभर लागू केली आहे. त्यास अनुसरून ठाणे व पालघर जिल्ह्यांतील टीडीसीसी बँकेच्या ६८ शाखांमध्ये या कर्जदार शेतकºयांचा लेखाजोखा काढला जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील ३९६ सहकारी संस्थांद्वारे २५ हजार ८८२ शेतकºयांनी कर्ज घेतले आहे. त्यांच्या या कर्जाच्या खात्यांची तपासणी करण्यासाठी या दोन्ही जिल्ह्यांत ३८ बँक तपासनीस, १७४ सचिव कामाला लागले आहेत. त्यांच्याद्वारे ६८ बँक खात्यांतील कर्जफेडीची मोहीम सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
या दोन्ही जिल्ह्यांमधील २५ हजार ८८२ कर्जदार शेतकºयांनी आतापर्यंत दोन लाखांपर्यंतचे १२८ कोटी १९ लाख ३३ हजार ३७७ रुपये कर्ज घेतल्याचे आढळून येत आहे. या मुद्दल कर्जापोटी आतापर्यंत २९ कोटी २१ लाख ७२ हजार २३० रुपये व्याज झाले आहे. या मुद्दल व व्याजाची रक्कम मिळून या शेतकºयांच्या १५७ कोटी ४१ लाख पाच हजार ६७७ रुपयांच्या कर्जमाफीचा अंदाज टीडीसीसी बँकेकडून व्यक्त करण्यात आला आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ७२५ शेतकºयांचे सर्वाधिक ८९ कोटी ८९ लाख २६ हजार ७६४ रुपये कर्जमाफी होत आहे. पालघर जिल्ह्यातील ११ हजार १५७ शेतकºयांचे ६७ कोटी ५१ लाख ७८ हजार ९१३ रुपये कर्जमाफी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पालघर जिल्ह्यात ६७ कोटी ५१ लाखांची कर्जमाफी
ठाण्याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील ११ हजार १५७ शेतकºयांनी १८९ सहकारी संस्थांद्वारे ३५ टीडीसीसी बँकांतून कर्ज घेतल्याचे आढळून येत आहे. त्यांच्या या व्यवहाराची १७ बँक तपासनीस व संस्थेच्या ८० सचिवांकडून शहानिशा केली जात आहे. या ११ हजार १५७ शेतकºयांनी ५५ कोटी ६७ लाख ६८ हजार ५२५ रुपये कर्ज घेतले आहेत. या मुद्दलीवर ११ कोटी ८४ लाख १० लाख ३८८ रुपये व्याज झालेले आहे. मुद्दलीच्या रकमेसह व्याज मिळून ६७ कोटी ५१ लाख ७८ हजार ९१३ रुपयांची कर्जमाफी पालघर जिल्ह्यातील शेतकºयांना मिळणार आहे. या कर्जदार शेतकºयांचे दोन लाखांपर्यंतच्या कर्जाचे खाते या योजनेमुळे निरंक होण्याची अपेक्षा शेतकºयांकडून केली जात आहे.