तेवीस कंत्राटदारांना पकडणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 11:06 PM2019-06-09T23:06:52+5:302019-06-09T23:07:07+5:30

आर्थिक गुन्हे तपासशाखा : किती दिवस कागदोपत्री दाखविणार फरार

Twenty-three contractors to catch? | तेवीस कंत्राटदारांना पकडणार कधी?

तेवीस कंत्राटदारांना पकडणार कधी?

Next

नालासोपारा : वसई विरार शहर महानगरपालिकेत ३१६५ ठेका कर्मचाऱ्यांचा पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता २५ कंत्राटदारांनी हडप केला म्हणून २ मार्च २०१९ ला विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पण नाममात्र २ कंत्राटदारांना अटक करून व गुन्हा दाखल होऊनही चार महिने उलटल्यानंतरही २३ कंत्राटदारांना अद्याप पर्यंत अटक न केल्यामुळेच ते बिनधास्तपणे वसई तालुक्यात वावरत असून कागदपत्रांवर मात्र फरार आहेत. प्रथम हा गुन्हा विरार पोलिसांकडे होता पण तपास व्यवस्थीत होत नसल्याने व हा विषय दैनिक लोकमतने लावून धरल्याने तो तपास पालघर अप्पर पोलीस अधीक्षकांनी १५ मे रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला पण अद्याप तपास मात्र शून्य. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेल्यानंतर तरी आम्हाला न्याय मिळेल या प्रतिक्षेत असणाºया कामगारांची मात्र घोर निराशाच झाली आहे.

१२२ करोडच्या घोटाळ्याचा योग्य तो तपास होऊन दोषी कंत्राटदार आणि मनपा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून पोलिसांनी कर्मचाºयांना न्याय मिळवून देणे गरजेचे होते पण आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी गुन्हे दाखल झालेल्या २३ कंत्राटदारांना मात्र ते त्यांचे नातेवाईक किंवा जावई असल्याप्रमाणे आर्थिक व्यवहार करून पाठींशी घातल असल्याची चर्चा सध्या वसईत जोर धरू लागली आहे. जर खरोखरच तपास अधिकाºयांना कामगारांना न्याय द्यायचा असता तर वसई न्यायालयाने अंतरिम जामीन नामंजूर केलेल्या कंत्राटदारांना वेळ न घालवता त्यांनी कधीच अटक केली असती पण त्यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्याऐवजी गुन्हे दाखल असलेल्या कंत्राटदारांना न्यायालयाकडून जामीन कसा मिळेल यावर लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हा वर्ग केल्यानंतर २१ मे रोजी वसई न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी महेश शेट्टे यांनी या गुन्ह्याबाबत कंत्राटदारांनी कर भरलेले आहेत की नाही याबाबत संबंधित खात्यासोबत पत्रव्यवहार केलेला असून तिकडून काही उत्तरे येणे बाकी असल्याचा जबाब दिला असल्याचे सूत्रांकडून कळते तर आठ दिवसांनी २९ मे रोजी पुन्हा वसई न्यायालयात अटक आरोपी विलास चव्हाण याने शासनाच्या विविध करापोटी १ कोटी भरले असून उर्वरीत १ कोटी रु पये भरावयाचे आहे अशी दुहेरी भूमिका घेणारा जबाब दिला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. आरोपी व अटक कंटारदार विलास चव्हाण याने १ कोटी भरल्याचे कोणाकडून सर्टीफाय करून घेतले ? सेवा कर, व्यवसाय कर, कामगार राज्य विमा योजना, कामगार आयुक्तालय तसेच संबंधित विभागाकडून याबाबत सर्टिफाय केल्याशिवाय आरोपी सांगतो म्हणून तपास अधिकाºयाने न्यायालायत कसा काय जबाब दिला व त्याचे म्हणणे कसे काय ग्राह्य धरले असे अनेक प्रश्न उभे टाकले असून त्यांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गुन्हे दाखल झाल्यावर फरार असलेले कंत्राटदार

दिव्या इंटरप्राइजेस (कमलेश ठाकूर), वेदांत इंटरप्राइजेस (समीर विजय सातघरे), मधुरा इंटरप्राइजेस (समीर सातघरे), गजानन इंटरप्राइजेस (अर्चना पाटिल), संखे सिक्युरिटी सर्व्हिस (दिनेश भास्कर संखे), श्रीजी इंटरप्राइजेस (योगेश घरत), ओम साई एंटरप्राइजेस (विनोद पाटिल), वरद एंटरप्रायजेस (सुरेंद्र बी. भंडारे), वरद एंजिनिअरिंग (अभिजित गव्हाणकर), स्वागत लेबर कॉन्ट्रक्टर (नंदन जयराम संखे), क्लासिक एंटरप्राइजेस (दिनेश पाटील), द हिंद इलेक्तिट्रकल अँड इंजीनियर (किशोर नाईक), सिद्धी विनायक एंटरप्राइजेस (नितिन शेट्टी), अथर्व एंटरप्राइजेस, सद्गुरु ट्रेडिंग कंपनी (जिग्नेश देसाई), शिवम एंटरप्रायजेस (तबस्सुम ए.मेमन), रिलाएबल एजन्सी ( झकीर के. मेमन), चिराग लेबर कॉन्ट्रक्टर (राजाराम एस गुटूकडे), युनिव्हर्सल एंटरप्रायजेस (सुबोध देवरु खकर), बी एल होणेंज सिक्युरिटी (सुरेंद्र भंडारे), जीवदानी फायर सर्व्हिसेस (किशोर पाटील), आरती सुनील वाडकर आणि श्री अनंत एंटरप्रायजेस (रवी चव्हाण)

विरार पोलिसांनी तपास केला नसल्यामुळे तो आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग केला आहे. ज्यांचे पैसे या कंत्राटदारांनी खाल्ले आहेत त्यांचे जबाब सुद्धा विरार पोलिसांनी घेतले नव्हते. तपास कुठ पर्यंत आला ते तुम्हाला कळवतो. -विश्वास वळवी, पोलीस उपअधीक्षक,

वसई न्यायालयाने कंत्राटदारांचा अंतरिम जामीन नामंजूर केला तरी त्यांना अटक का केली नाही ? न्यायालयाने त्यास मनाई केली आहे का ? की वरिष्ठ अधिकाºयांने अटक न करण्याचा आदेश दिला आहे का ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पण पोलिसांना कामगारांचे काहीही सोयरसुतक नाही. पोलीसच कंत्राटदारांना पाठीशी घालत आहेत.
- निलेशी खराते, वकील,


घोटाळा नक्की कितीचा ?
१२२ करोडचा घोटाळा झाला म्हणून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पण याची वास्तविकता पाहता हा घोटाळा १० पटीपेक्षा जास्त असल्याचे सूत्रांकडून कळते आहे. म्हणून या घोटाळ्याची एस आय टी चौकशी केली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन याचे बिंग फुटून घोटाळा कितीचा झाला हे उघड होईल तर या घोटाळ्यास नक्की कोण जवाबदार आहे हे सुद्धा बाहेर येईल.

Web Title: Twenty-three contractors to catch?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.