बावीस हजार सभासदांच्या ड्रॉ योजनेत मोठा अपहार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:43 AM2018-02-20T00:43:45+5:302018-02-20T00:43:48+5:30
येथील गायत्री मार्केटिंगच्या भेटवस्तू योजनेत मोठा अपहार होऊन या योजने मध्ये सुमारे १० ते १२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून फसवणूक झालेल्या काही
पंकज राऊत
बोईसर : येथील गायत्री मार्केटिंगच्या भेटवस्तू योजनेत मोठा अपहार होऊन या योजने मध्ये सुमारे १० ते १२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून फसवणूक झालेल्या काही सभासदांनी बोईसर पोलीसांत तक्रार दाखल केली आहे.
गायत्री मार्केटींग ही भेटवस्तू योजना चालविणाºया वापी येथील नऊ संचालकांनी बोईसरच्या ओस्तवाल एम्पायर येथे कार्यालय थाटून ही योजना फेब्रुवारी २०१६ मध्ये सुरू केली. सप्टेंबर २०१७ पर्यंत सुमारे बावीस हजार सदस्य त्या मध्ये सहभागी झाल्याचा अंदाज आहे.या योजनेमध्ये तेरा हजार रुपये टप्प्याटप्प्याने एजंटामार्फत जमा केल्यानंतर प्रत्येक महिन्याला लकी ड्रॉ मधून एक कार, एकोणीस मोटारसायकली तर ३० टीव्ही अशा ५० ग्राहकांना वस्तू देण्यात आल्या.
परंतु काही महिन्यानंतर या योजनेमध्ये बक्षीस न लागणाºया सुमारे पंधरा हजार ग्राहकांपैकी सहा ते आठ हजार ग्राहकांना दिलेल्या वॉशिंग मशिन, टीव्ही, फ्रीज, एअर कंडिशनर, लॅपटॉप इत्यादी वस्तू निकृष्ट होत्या त्यामुळे संतप्त ग्राहकांनी पोलिसांत तक्र ार केली आहे. या नंतर गायत्री मार्केटिंग चे बोईसर येथील आॅफिस बंद करण्यात आले असून संचालक ही फरार झाल्याचे फसगत झालेले ग्राहक सांगत आहेत. हा गुन्हा मोठया रकमेचा असल्याने पुरावे व संचालकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून लवकरच दोषींना ताब्यात घेतले जाईल असे बोईसर पोलिसांनी सांगितले.