वाढीव घरपट्टीविरोधात जबाब दो आंदोलन, प्रत्यक्षात प्रशासनाने केली ७० टक्के कर वाढ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 03:20 AM2018-03-13T03:20:26+5:302018-03-13T03:20:26+5:30

वसई विरार महापालिकेने वाढवलेल्या अन्यायकारक घरपट्टीविरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नगरसेवकांना जाब विचारणारे जबाब दो आंदोलन रविवारी निर्मळपासून सुरु केले आहे.

The two agitations against the increased houseplant, actually the 70 percent tax hike made by the administration? | वाढीव घरपट्टीविरोधात जबाब दो आंदोलन, प्रत्यक्षात प्रशासनाने केली ७० टक्के कर वाढ?

वाढीव घरपट्टीविरोधात जबाब दो आंदोलन, प्रत्यक्षात प्रशासनाने केली ७० टक्के कर वाढ?

Next

वसई : वसई विरार महापालिकेने वाढवलेल्या अन्यायकारक घरपट्टीविरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नगरसेवकांना जाब विचारणारे जबाब दो आंदोलन रविवारी निर्मळपासून सुरु केले आहे.
यावेळी जन आंदोलनाचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर, कार्याध्यक्षा डॉमणिका डाबरे, प्रा. विन्सेंट परेरा, प्रफुल्ल ठाकूर, रुपेश रॉड्रीग्ज, काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील, निलेश पेंढारी, आम आदमी पार्टीचे सुमीत डोंगरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे, शिवसेनेचे विनायक निकम, निर्भय जन मंचाचे जॉन परेरा, भाजपाचे शाम पाटकर, रिक्सन तुस्कानो, आशिष जोशी, मनसेचे विजय मांडवकर सहभागी झाले होते.
पुढील पाच वर्षात कोणतीही करवाढ करणार नाही, असे वचननाम्यात जाहिर करणाºया सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने अवघ्या दोन वर्षात मालमत्ता करात ७० टक्के वाढ केली आहे. महापालिकेने तिच्या वसुलीला सुरुवात केल्याने गावकºयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. महापालिकेची कोणतीही शाळा नसताना शिक्षणकराचा मोठा बोजा टाकण्यात आला आहे. त्यामुळे गावकरी भयभीत झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
निर्मळ नाक्यावर निषेध आंदोलन केल्यानंतर स्थानिक नगरसेवक पंकज चोरघे यांच्या कार्यालयासमोर जबाब दो आंदोलन करण्यात आले. रुपयाला ४० पैशानुसार आम्ही मालमत्ता कराला सभागृहात मान्यता दिली होती. त्यानंतर मागणी पत्र आल्यावर सुमारे ७० टक्के वाढ झाल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळे आम्ही सर्व नगरसेवकांनी या वाढीला विरोध केला. आम्ही या प्रश्नी ग्रामस्थांच्या सोबत आहोत, असे चोरघे यांनी यावेळी मोर्चेकºयांना सांगितले.

Web Title: The two agitations against the increased houseplant, actually the 70 percent tax hike made by the administration?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.