नवजीवन येथील खदाणीत दोन मुलांचा बुडून मृत्यू; महसूल विभागाचा नाकर्तेपणा पुन्हा उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 04:13 PM2024-09-27T16:13:27+5:302024-09-27T16:14:35+5:30

नवजीवन येथील खदाणीमध्ये आतापर्यंत जवळपास ५५ जणांचा बुडून मृत्यू

Two children drowned in Navjeevan quarry; The revenue department's incompetence is exposed again | नवजीवन येथील खदाणीत दोन मुलांचा बुडून मृत्यू; महसूल विभागाचा नाकर्तेपणा पुन्हा उघड

नवजीवन येथील खदाणीत दोन मुलांचा बुडून मृत्यू; महसूल विभागाचा नाकर्तेपणा पुन्हा उघड

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: पावसाच्या पाण्याने भरलेल्या खदाणीत आणखी दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. वसईच्या नवजीवन येथील खदाणीमध्ये आतापर्यंत जवळपास ५५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. असे असतानाही वसईतील महसूल विभाग चीरनिद्रेत आहे. तहसीलदारांसह कार्यालयातील संबंधित अधिकारी,  प्रांत अधिकारी यांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताबाबत भावना बोथट, निपरवड झाल्याचे सिद्ध होत आहे.

गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नवजीवन येथील उघड्या स्वरूपाच्या असलेल्या खदाणीमध्ये धानिवबागच्या प्रल्हाद चाळीत राहणारे नसीम चौधरी (१३) व सोपान चव्हाण (१४) दोघे आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी दोघांना पोहोता न आल्याने ते बुड़ु लागले. याची माहिती मुलांच्या घरी समजल्यावर त्यांचे पालक व इतर नागरिक खदाणीमध्ये पोहोचले. त्यांनी मुलांना वाचवण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेतच रेंज ऑफिस जवळील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. वालीव पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद झाली आहे. 

अशा स्वरूपाच्या खदाणीना भक्कम कुंपण असणे आवश्यक आहे मात्र खदान मालकाने याचे उल्लंघन केले असताना केवळ आर्थिक लाभापोटी इतक्या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत सामाजिक संघटना, राजकीय पक्ष त्यांचे प्रतिनिधी यांनी उपविभागीय अधिकारी वसई,व तहसीलदार यांना वारंवार तक्रारी निवेदने देऊन यावर कारवाईच्या मागण्या केल्या होत्या. 

परंतु, निबर झालेले अधिकारी त्यांच्या वागणुकीमुळे कनिष्ठ कर्मचारी अशा स्वरूपाच्या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आले आहेत. परिणामी वसईतील सर्वसामान्य नागरिक व लहान बालक यांना अशा स्वरूपाच्या दुर्दैवी मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. खदाण मालक व वरिष्ठ अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध सर्वश्रुत आहेत. आतापर्यंत कोटी रुपयांची थकबाकी वसुली बाकी आहे. २०१५ च्या अहवालानुसार ही वसुली २७८ कोटी होती. नऊ वर्षात त्यात आणखी काही कोटींची भर पडलेली आहे. तरीही ती वसूली आजतायगत न करता महसूललाचे पद्धतशीर नुकसान करून खदाण मालकांना पाठीशी घातले जात आहे. 

वास्तविक पाहता ज्या खदाण मालकाचा ठेका आहे त्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होणे अपेक्षित आहे. परंतु, वसईतील महसूल विभाग अशा खदाण मालकांना, ठेकेदारांना पाठीशी घालून त्यांचे लाड करत आहे. या घटनेबाबत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना विचारणा केली असता, २४ तास उलटल्यानंतरही त्यांना या घटनेची माहिती देण्यात आलेली नव्हती. वसईतल्या बेजबाबदार महसूल यंत्रणेबाबत त्यांना सांगितले असता, अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ सूचना देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

Web Title: Two children drowned in Navjeevan quarry; The revenue department's incompetence is exposed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.