पासोडीपाड्यातील दोन घरे व तीन गुरे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:47 PM2019-06-04T22:47:00+5:302019-06-04T22:47:09+5:30
आगीचे कारण अस्पष्ट : कुटुंबाकडे उपजीवेकेसाठी काहीच उरले नाही
जव्हार : तालुक्यातील ग्रामपंचायत खांबाळापैकी पासोडीपाड्यातील शेतावरील दोघा आदिवासींची घरे जळून खाक झाली असून, मोठी नुकसान झाले असून दोन्ही कुटुंब रस्त्यावर आले आहेत. घरासोबत एक बैल, गाय, वासरू यांचे होरपळन दुर्दैवी मृत्यु झाले तर वर्षभराचे साठवलेले धान्य जळून खाक झाले आहे. परंतु आगीचे कारण समजू शकले नाही.
खंबाळा पैकी पासोडीपाडा येथील शंकर जानू रोज (४५) आणि रमेश रोज (४९) या दोघांची घरे पासोडीपाड्याच्या खाली सिल्वासा हद्दीला लागून शेतावर गेल्या १५ ते २० वर्षांपासून राहत होते.
परंतु सोमवारी हे दोन्ही घरातील माणसं बाहेर गेले होते. मात्र घरात कोणीही नसतांना मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्या लागलेल्या आगीत त्या आदिवासीच्या शेतावरील कुडा मातीची घरे संपूर्ण जळाली असून, मोठे नुकसान झाले आहे. त्या जळालेल्या घरात बैल, गाय, वासरू, आणि वर्षभराचे धान्य, तसेच शंकर रोज यांचे १० हजार रुपये जळालेचे सांगितले. त्यामुळे या आदिवासी कुटुंबांचे मोठे नुकसान होवून ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला अडचणीत आले आहे. त्यामुळे वर्ष काढायचे कसे अशी अडचण या कुटुंबांना पडली आहे.
तसेच या कुटुंबाकडे उपजीविकेचे साधन काहीच उरले नाही. त्यामुळे हे दोन्ही कुटुंब अडचणीत सापडली आहेत.
संपूर्ण घर जळून खाक झाल्यानंतर या कुटुंबाकडे उपजीवेकेसाठी काहीच उरले नाही अंगावरील कपड्यांसोबत हतबल झालेल्या या कुटुंबाला तत्काळ मदत देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेची माहीती मिळताच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा आणि त्यांच्या सहकारीने घटनास्थळी भेट देवून त्यांना गहू तांदूळ बरोबरच कपडे आणि किराणा सामान देवून या कुटुंबाला आधार देवून खऱ्या अर्थाने सांत्वन केले. यावेळी त्या कुटुंबानीही त्यांचे आभार मानले.