महामार्गावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 06:16 PM2023-02-10T18:16:30+5:302023-02-10T18:16:59+5:30

या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मिरा रोडच्या वॉकर्ड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Two killed and two seriously injured in a terrible accident on the highway | महामार्गावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

महामार्गावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

googlenewsNext

- मंगेश कराळे

नालासोपारा :  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला ठोकर मारून भीषण अपघात सकवार गावाच्या हद्दीत गुरुवारी सकाळी झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मिरा रोडच्या वॉकर्ड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मुंबईच्या प्रभादेवी येथे राहणारे अशोक मुसळे (७१), रमेश मुसळे (५१), माधुरी मुसळे (५०) आणि रुचिक देसाई (३०) हे चौघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून पालघरला ह्युंदाई क्रेटा एम एच ०१ डीटी ९९१९ या क्रेटा कारने गुरुवारी सकाळी जात होते. सकाळी साडे दहाच्या सुमारास सकवर गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपापासून ४०० मीटर अंतरावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील डिव्हायडरला ठोकर दिल्याने अपघात झाला. 

जखमींना तत्काळ पेल्हारच्या गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रमेश मुसळे (५१) आणि रुचिक देसाई (३०) या दोघांचा तीन वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अशोक मुसळे (७१) आणि माधुरी मुसळे (५०) या दोघाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. 

महामार्गावर अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला ठोकर मारून भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
- प्रफुल वाघ (पोलीस निरीक्षक, मांडवी पोलीस ठाणे)

Web Title: Two killed and two seriously injured in a terrible accident on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात