दोन लाखाच्या हुंडयासाठी वरात नेली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:41 AM2018-06-28T00:41:39+5:302018-06-28T00:41:45+5:30
वर पक्षाने चक्क लग्न मंडपात २ लाखाचा हुंडा मागितला, तो न मिळाल्याने विवाह मोडून वरपक्ष वरात परत घेऊन जाण्याची घटना नालासोपाऱ्यात घडली.
विरार : वर पक्षाने चक्क लग्न मंडपात २ लाखाचा हुंडा मागितला, तो न मिळाल्याने विवाह मोडून वरपक्ष वरात परत घेऊन जाण्याची घटना नालासोपाऱ्यात घडली.
नालासोपारा पूर्वेला संतोष भुवन या परिसरात एकता चाळीत राहणाºया सुहेल शहा यांच्या शबाना ह्या मुलीचे त्यांच्याच विभागात राहणाºया नूर मन्सुरी या मुलाशी प्रेम होते. मुलीची बाजू असल्याने आपली बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी या लग्नाला होकार दिला. दोन्ही पक्षाच्या मर्जीने हे लग्न ठरले. यावेळी मुलाच्या नातेवाईकांनी १ लाख रुपयांची मागणी केली होती पण आपली परिस्थिती नसल्याने विभागातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मदतीने ही समजूत काढून २४ जून रोजी रोजी लग्न ठरले. तोवर मुलाच्या नातेवाईकांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. पण लग्नाच्या दिवशी निकाह झाल्यानंतर २ लाख रु. दे नाहीतर वरात परत नेऊ अशी धमकी दिली. पण आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगून त्यांनी विनवण्या केल्या. पण मुलाकडील नातेवाईकांनी त्यांचे काही ऐकले नाही आणि भर मंडपात मुलीला मारहाण करून वरात परत नेली.
वधू सुहेल ही या प्रकरणाबाबत तुळींज पोलीस ठाण्यात तक्र ार देण्यास गेली असता. लेखी तक्रार द्या एवढेच सांगण्यात आले. मात्र हा सर्व प्रकार खोटा असल्याचे मुलाच्या मावशीने सांगितले, आम्ही कोणत्याही प्रकारचे पैसे मागितले नाहीत, उलट मुलीच्या घरच्यांनी पाहुणचार केला नाही, वº्हाड उपाशी ठेवले म्हणून आम्ही वरात परत आणली असे सांगितले.