वसईत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 02:24 AM2018-03-18T02:24:07+5:302018-03-18T02:24:07+5:30
विरार आणि वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत.
विरार : विरार आणि वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या घटना घडल्या आहेत.
सांताक्रुझ येथे राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलीवर एका इसमाने विरार येथे आणून बलात्कार केला. याप्रकरणी कुणालाही सांगू नये यासाठी पिडीत मुलीला धमकीही दिली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात ३७६, ५०६ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४, ५ (ज), ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीवर आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली. यावेळी पिडीत मुलीने विरोध केला असता आरोपीने गळा आवळून ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्याच्या ह द्दीत गुन्हा दाखल झाला आहे.