दोन महिन्यांपासून रुग्णालयात एक थेंबही पाणी नाही
By admin | Published: May 14, 2016 12:39 AM2016-05-14T00:39:27+5:302016-05-14T00:39:27+5:30
पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसत असून त्याचा फटका आरोग्य सेवेलाही बसत आहे. खर्डी ग्रामीण रु ग्णालयातील बोअरवेलचे पाणी आटल्याने आणि पाणीपुरवठा नियमित होत नसल्याने
खर्डी : पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसत असून त्याचा फटका आरोग्य सेवेलाही बसत आहे. खर्डी ग्रामीण रु ग्णालयातील बोअरवेलचे पाणी आटल्याने आणि पाणीपुरवठा नियमित होत नसल्याने त्याचा परिणाम येथील आरोग्य सेवेवर झाला आहे.
रुग्णालयात रात्रीअपरात्री येणाऱ्या रु ग्णांची संख्या मोठी असून पिण्यासाठी, साफसफाईसाठी, कपडे धुण्यासाठी अशा विविध कामांकरिता पाण्याची गरज असताना रु ग्णालयात पाण्याची दुसरी कोणतीही सोय नसल्याने कर्मचाऱ्यांसह रु ग्णांचे मोठे हाल होत आहेत.
गेल्या १५ दिवसांपासून येथे प्रसूतीकरिता येणारे पेशंट पाणी नसल्याच्या कारणाने नाइलाजाने पुढे पाठवावे लागत आहेत. अपघातांचे रु ग्ण उपचारासाठी येथे दाखल केल्यानंतर साफसफाईकरिता पुरेसे पाणी मिळत नाही. याबाबत, रु ग्णालय प्रशासनाने वेळोवेळी शहापूर पंचायत समिती, खर्डी ग्रामपंचायतीला या समस्येबाबत निवेदन दिले. मात्र, अद्यापही कुठलीही सोय झालेली नाही.
पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी बोलून टंचाईग्रस्त भागांना पाणीपुरवठा करणारे जे टँकर आहेत, त्यातून खर्डी ग्रामीण रुग्णालयाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)