ग्रामीण बँकेसह दोन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 03:13 AM2018-03-17T03:13:04+5:302018-03-17T03:13:04+5:30

शहरातील बाजार पेठेतील उधवा रोड वरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह हार्डवेअर व डॉक्टरचे क्लिनिक रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फोडून रोकड पळविली मात्र, बँकेतील रोकड लांबवितांना त्यांना यश आले नाही त्यातच ते बँकेच्या सीसीटिव्हीत कैद झाले आहेत.

Two shops with Grameen Bank | ग्रामीण बँकेसह दोन दुकाने फोडली

ग्रामीण बँकेसह दोन दुकाने फोडली

Next

तलासरी : शहरातील बाजार पेठेतील उधवा रोड वरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह हार्डवेअर व डॉक्टरचे क्लिनिक रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फोडून रोकड पळविली मात्र, बँकेतील रोकड लांबवितांना त्यांना यश आले नाही त्यातच ते बँकेच्या सीसीटिव्हीत कैद झाले आहेत.
उधवा रोड वरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा मुख्य दरवाज्याचे टाळे फोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. कॅशिअर चे केबिनचे टाळे तोडले पण त्यांना रोकड लांबविता आली नाही. दरम्यान, ते चोरटा बँकेच्या सीसीटिव्हीत कैद झाला आहेत. बँकेचा मुख्य दरवाज्याचा टाळा तोडला असतांना सावधानतेचा भोंगा नादुरु स्त असल्याने तो वाजला नाही. तसेच, बँकेच्या बाजूला असलेल्या हार्डवेअरचे दुकान फोडून एक हजार रु पये रोकड त्यांनी लांबविली तर डॉ. पाटील यांचे प्रेरणा क्लिनिक फोडून गल्ल्यातील तीन हजार रु पये लंपास केले.
सद्या तलासरी गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. पोलिसांची गस्त सुस्त असल्याने चोरटे गावात फिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
तलासरी गावात मोठ्या प्रमाणात भंगार खरेदी विक्री करणारे आल्याने चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. गावात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या अनोळखी इसमा विरोधी कारवाई करणे गरजेचे आहे. तलासरी बाजार पेठेत, गावात अधिकाºयांबरोबर पोलिसांची गस्त संध्याकाळी दिसून येते. मात्र, रात्रीच्या गस्ती वाढविण्याची वेळ आली आहे. या पूर्वीसुद्या अनेक गुन्ह्याच्या घटनांमध्ये सीसीटीव्हीची मदत झाली होती मात्र त्या प्रकरणांमध्ये गुन्हेगार सापडल्याचे दिसत नाही.

Web Title: Two shops with Grameen Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.