भुरळ घालणा-या दोन भामट्यांना अखेर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 04:24 AM2018-02-04T04:24:28+5:302018-02-04T04:24:36+5:30
चटाळे येथील मधुकरनगर येथून पायी जात असतांना पत्ता विचारायच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल असा ऐवज चोरून नेणा-या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.के एस हेगाजे यांनी अटक केली.
पालघर : चटाळे येथील मधुकरनगर येथून पायी जात असतांना पत्ता विचारायच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल असा ऐवज चोरून नेणा-या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.के एस हेगाजे यांनी अटक केली.
ते १५ सप्टेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास पायी स्कूटरवरून आलेल्या दोन भामट्यांनी एडवणकडे जाणारा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून भुरळ पाडली व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मोबाईल असा ३५ हजार ८०० रु पये किंमतीचा ऐवज लांबविला होता. ह्या प्रकरणी केळवे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र ५ महिन्यांचा कालावधी उलटून गेल्या नंतरही त्यांचा शोध लागत नव्हता. या प्रकरणी दोन्ही अज्ञात चोरट्यांचे स्केच काढण्यात आल्या नंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.हेगाजे यांना या प्रकरणातील आरोपी हे सफाळे भागातील असल्याची माहिती खबºयांच्या मार्फत मिळाली.त्यांनी अधिक चौकशी करीत विराज उर्फ ससा संतोष ठाकूर आणि शहाबाज उर्फ बकरा खालिद शेख ह्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतले.त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्या नंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी ह्या गुन्ह्यातील ऐवज आणि स्कूटर ताब्यात घेतली आहे.
पुढील तपास केळवे पोलीस करीत असून त्यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.