बनावट डॉलरप्रकरणी महिलेसह दोन अटकेत
By admin | Published: May 29, 2016 02:41 AM2016-05-29T02:41:56+5:302016-05-29T02:41:56+5:30
तीन लाख रुपयांचे बनावट डॉलर देऊन फसवणूक केल्याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
वसई : तीन लाख रुपयांचे बनावट डॉलर देऊन फसवणूक केल्याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
अंधेरी जुहू येथील इस्कॉन टेम्पल टॅक्सी स्टँडवर असलेला ड्राव्हर अशरफ शेख यांना तीन लाखांचे डॉलर स्वस्तात देण्याची बतावणी करून मोहम्मद हुसेन आणि सलमा आलम या नालासोपारा येथे राहणाऱ्या आरोपींनी फसवणूक केली होती.
२२ मेला या दोघांनी अशरफ शेख याला २० डॉलरची नोट देऊन त्याच्या कडून पाचशे रुपये घेतले होते. त्यानंतर २५ मेला वसई रोड रेल्वे स्टेशनजवळ बोलावून पुन्हा डॉलरच्या नोटा देऊन अशरफची फसवणूक केली होती.
डॉलरच्या नोटा बनावट असल्याचे उजेडात आल्यानंतर अशरफने माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मोहम्मद आणि सलमा यांचविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांचा एक साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
(प्रतिनिधी)