उद्धव ठाकरेंना अल्प प्रतिसाद, पालघर दौरा ‘फसला’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 05:11 AM2019-04-05T05:11:26+5:302019-04-05T05:12:25+5:30

पालघर दौरा ‘फसला’ : नियोजन नाही, उपस्थिती नाही, शिवसैनिक नाराज

Uddhav Thackeray's short response, Palghar tour 'failed' | उद्धव ठाकरेंना अल्प प्रतिसाद, पालघर दौरा ‘फसला’

उद्धव ठाकरेंना अल्प प्रतिसाद, पालघर दौरा ‘फसला’

Next

पालघर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पालघर जिल्हा प्रचार दौऱ्याला अल्प प्रतिसाद मिळाला असून या दौऱ्यात बोईसर, पर्नाळी पाचमार्ग चिंचणी येथे त्यांनी जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तर या दौºयात पाचमार्ग येथील सभेत मच्छीमारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आश्वासनांची खैरात करून नाराज मच्छीमारांना तसेच स्थनिक भूमिपुत्रांना कुरवाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या सोबत पालक मंत्री एकनाथ शिंदे, खा.राजेन्द्र गावित, आ. रविंद्र फाटक, श्रीनिवास वनगा व सेनेचे स्थानिक पदाधिकारी होते.

पाचमार्ग येथे बुधवारी दुपारी झालेल्या सभेत बोलताना ठाकरे यानी वाढवण बंदर जर स्थानिकांना नको असेल तर होऊ देणार नाही, जिंदाल जेटीलाही विरोध करु , तारापूर अणुशक्ती केंद्रापासून महामार्गा पर्यंत आपत्कालीन चौपदरी मार्ग, दांडी-नवापूर खिंडीवर पूल बांधणे, तारापूर अणुशक्ती केंद्रातील कंत्राटी कमगाराना कायम करणे अशी प्रत्येक वेळी दिली जाणारी आश्वासने दिलीत. नागझरी येथे तीन तासांपासून वाट पाहत असलेल्या शिवसैनिक निराश झाले. ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील या आशेने स्टेज निर्माण केले होते. मात्र ठाकरे यांनी रस्त्यावरच शिवसैनिकांशी पाच मिनिटे चर्चा केली त्यामुळे तीन तास वाट बघत असलेल्या शिवसैनिकांना निराश होऊन परतावे लागले.

एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्यात शिवसेनेची लावली वाट

च्जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांना दाबून टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी गेले वर्षभर केलेले कुटील प्रयत्न, पालघर नगराध्यक्षपदासाठी सेनेच्या अनेक महिला इच्छुक व सक्षम असतांना त्यांच्याऐवजी राष्टÑवादीतून आयात केलेल्या महिलेला ती उमेदवारी बहाल केली.

च्मतदारांनी तिला पराभूत केले आणि या पालिकेतील शिवसेनेची सत्ता संपुष्टात आली. एवढा दणका बसला तरी शिंदेंची दादागिरी आणि पैशाच्या जोरावरची दमनशक्ती सुरू असल्याने या जिल्ह्यातील शिवसेनेत मरगळ पसरली आहे.

च्जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे यांना पराभूत करण्यासाठी सेनेच्याच मंत्र्याने म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जंगजंग पछाडले असे अभूतपूर्व दृश्य पालघर पालिकेच्या वॉर्ड क्र. ८ अ मध्ये पहायला मिळाले. या सगळ्याचा परिणाम पालघर लोकसभा निवडणुकीवर होतो आहे.
 

Web Title: Uddhav Thackeray's short response, Palghar tour 'failed'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.