गुंडगिरी मोडून सत्तेचा माज उतरवणार, उद्धव यांची हितेंद्र ठाकूरांवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 06:43 IST2019-04-27T23:05:04+5:302019-04-28T06:43:50+5:30
नालासोपारा पश्चिमेकडील वंडा परिसरातील बौद्धस्तुपाच्या लगतच असलेल्या मोकळ्या मैदानावर उद्धव ठाकरेंची राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी व २९ गावांच्या मुद्यावर बोलण्यासाठी कृतज्ञता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते.

गुंडगिरी मोडून सत्तेचा माज उतरवणार, उद्धव यांची हितेंद्र ठाकूरांवर टीका
नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील वंडा परिसरातील बौद्धस्तुपाच्या लगतच असलेल्या मोकळ्या मैदानावर उद्धव ठाकरेंची राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी व २९ गावांच्या मुद्यावर बोलण्यासाठी कृतज्ञता मेळाव्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी वसई मधील गुंडगिरी मोडून काढून सत्तेचा माज उतरविणार असल्याची भाषा विरोधंकाबाबत केली आहे. यावेळी व्यासपीठावर दीपक केसरकर, उमेदवार राजेंद्र गावित, एकनाथ शिंदे, विवेक पंडित, रवींद्र फाटकसह अनेक महायुतीचे अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.
वसईमध्ये काही डॉक्टर, इंजिनिअर, वकील, साहित्यिक, शिक्षक आदींची व्यथा आणि समस्यां एकण्याकरिता भेट असल्यामुळे दोन तास उशीर झाल्याने दिलिगरी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. २५ वर्षे सत्ता भोगूनही वसईमधील सामान्य लोकांच्या व्यथा आणि समस्यां अजून पर्यंत का नाही सोडवल्या, २९ गावे वगळण्याचा प्रश्न किंवा त्या गावातील लोकांना मनपात सामील व्हायचे नसतानाही जबरदस्तीने मनपा त्यांच्यावर का लादता ? असे अनेक प्रश्न विरोधकांना विचारले आहे. भर उन्हात बसलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह बघून आनंदी झालो असून कार्यकर्ते विचाराने तापलेले असून उन्हाने नाही, गुंडगिरीने तापलेले आहे, लोकांची सहशीलता संपली असून ते तुम्हाला तुमची जागा दाखवून युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना निवडून आणणार असे उद्धव ठाकरे म्हणाले. या परिसरातील गुंडगिरी मोडून काढणार, संपवून टाकणार पण हे अशी थेट टीका आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर केली.
नाणार प्रकल्प नको म्हणून गावकऱ्यांनी माझी भेट घेतल्यावर शिवसेनाने नाणार प्रकल्पाविरोधात उभे राहून हा प्रकल्प होऊ दिला नाही व तो रद्द झाल्याचा आदेशही काढला आहे. तरी काही विरोधक अपप्रचार करत आहेत. विरोधी पक्ष सरकार ज्यांचे येते त्यांच्याकडे जाऊन पाया पडत माझ्यावरील असलेले गुन्हे व केसेस काढून टाकण्यासाठी स्वत: पाया पडतात. स्वत:ची कातडी त्यांनी आजपर्यंत वाचवली असून लोकांच्या समस्या आणि व्यथा सोडवल्या नसल्याचे ठाकरे म्हणाले.