वसई पालिकेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:25 AM2021-01-16T00:25:49+5:302021-01-16T00:26:04+5:30

साहाय्यक पालिका आयुक्त मात्र अनभिज्ञ

Unauthorized construction on Vasai Municipal Corporation land? | वसई पालिकेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम?

वसई पालिकेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या एच प्रभाग समितीअंतर्गत चुळणे येथे एका विकासकाने टोलेजंग इमारती बांधून आरक्षण पडलेली जागा महापालिकेला बक्षीसपत्राने तर दिली, मात्र याच ईएसआर आरक्षित भूखंडावरील आरक्षण उठले नसतानाही त्या ठिकाणी बांधकाम सुरू करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, पाण्याच्या टाकीसाठी आरक्षित असलेला भूखंड बिल्डरने बक्षीसपत्राने कागदोपत्री तर हस्तांतरित केला, मात्र प्रत्यक्षात तो पालिकेला हस्तांतरित केला नसल्याचे नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चुळणे येथील या जागेवर पूर्वी फलक होता, झाडेझुडपे वाढली होती, ती स्वच्छ केली असून तेथे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, या आरक्षण असलेल्या जमिनीवर कोण बांधकाम करते आहे, याची माहिती महापालिका ‘एच’ प्रभाग समितीचे ठेका बांधकाम अभियंता विवेक चौधरी, अतिक्रमण विभागाचे अभय चौकेकर आणि स्वतः साहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांना विचारली असता या ठिकाणी सुरू असलेले काम महापालिकेचे नाही. आम्ही ते काम लागलीच थांबवले आहे, अशी माहिती साहाय्यक आयुक्त मनाली शिंदे यांनी दिली.
भूखंड पालिकेच्या मालकीचा असताना आरक्षित जमिनीवर पालिकेचे ई.एस.आर. बाधित (पाण्याच्या टाकीची जागा) असे आरक्षण पडले आहे. असे असताना पालिकेने स्थानिक व माजी नगरसेवकांच्या लेखी पत्रावरून या जागेवरचे पाण्याच्या टाकीचे आरक्षणच रद्द करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी महासभेत घेतला. मात्र, आजही तो निर्णय प्रलंबित आहे. 

पालिका आयुक्तांनीही घेतली नाही माहिती
भूखंडावरील आरक्षण अजूनही उठलेले नाही. या आरक्षित भूखंडप्रकरणी तक्रार झाल्यावर तत्कालीन पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी तब्बल दोन वर्षांनी सुनावणी घेतली होती. मात्र, आता या सुनावणीला ४ वर्षे झाली, तरी सध्याचे आयुक्त गंगाथरन डी. यांनीसुद्धा या प्रकरणाची माहिती अद्याप नगररचना विभागाकडून घेतली नसल्याचे समजते.

Web Title: Unauthorized construction on Vasai Municipal Corporation land?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.