अनधिकृत शाळा मालक - चालकांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 11:40 PM2019-07-29T23:40:06+5:302019-07-29T23:40:15+5:30

मुख्यमंत्र्यांनाही साकडे : विरार युवक काँग्रेसचे सीईओंना निवेदन

Unauthorized School Owner - File crimes against drivers | अनधिकृत शाळा मालक - चालकांवर गुन्हे दाखल करा

अनधिकृत शाळा मालक - चालकांवर गुन्हे दाखल करा

Next

पारोळ : माहिती अधिकारात शिक्षण विभाग, पंचायत समिती वसई यांनी अनधिकृत शाळांची यादी दिली आहे. त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात १९० आणि एकट्या वसई तालुक्यात १५० अनधिकृत शाळा आहेत. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १५ जून २०१९ रोजीच्या पत्रान्वये या अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते.

तसेच संबंधित अनधिकृत शाळांना नोटीस बजावून शाळेच्या ठिकाणी अनधिकृत शाळा असल्याचा बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत, असे आदेश देताना आणि या शाळांमधील मुलांना मान्यताप्राप्त शाळेत दाखल करा, असे बजावताना त्यामध्ये कुठेही संबंधितांवर फौजदारी कारवाईचा उल्लेख केलेला आढळत नाही. या सगळ्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने फक्त आदेश देण्याचे आणि वरवरची कारवाई करण्याचे करण्याचे सोपस्कार पार पाडल्याचा आरोप विरार युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहसीन शेख यांनी केला आहे.
शेख यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीप्रमाणे या अनधिकृत शाळा प्राथमिक स्तराच्या आहेत. परंतु, हे शाळा चालक आणि मालक या शाळा माध्यमिक शिक्षण देत आहेत. याबद्दल प्रशासन मूग गिळून गप्प असल्याचे शेख म्हणतात. बहुतेक अनधिकृत शाळा इमारतींचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून आसन व्यवस्थेपेक्षा जास्त मुलांना एका वर्गात कोंबले जाते. इमारत बांधकामाची परवानगी न घेता शाळा इमारती उभारल्या आहेत. या शाळांमध्ये पडझड, गळती होत असते, तेथे साफसफाई, स्वच्छता राखली जात नाही. येण्या - जाण्यासाठीचे जिने अरूंद आहेत. अग्निशमनची व्यवस्था उपलब्ध नाही. शाळेलगतच बेकरी आहेत. शाळेतील मुलांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध नाही. शहरातील मुख्य रस्त्यालगत शाळेचे प्रवेशद्वार असून काही इमारतीतील जिने उतरले की सरळ मुले रस्त्यावर येतात, अशी भयाण वस्तुस्थिती असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी वसईच्या गटविकास अधिकाºयांना दिलेल्या आदेशांचे तत्काळ पालन करा तसेच अनधिकृत शाळेचे मालक - चालक तसेच त्यांना ना-हरकत दाखला देणाºया आणि त्यांना संरक्षण देणाºया विविध शासकीय, निमशासकीय विभागाचे अधिकारी आणि संबंधितांवर ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची त्यांची मागणी आहे.

शाळा सुरु होताना आणि सुटताना पालक व मुले सरळ रस्त्यावर येतात. यामुळे अपघात घडून जीवितहानी होण्याचा धोका आहे. शहरात वाहनांची संख्या बरीच आहे. एस.टी., महापालिकेची परिवहन सेवा, चार चाकी, दुचाकी वाहने, रिक्षा, मोठे ट्रक, पाण्याचे टँकर यांची वर्दळ दिवसभर सुरु असते. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या सर्व प्रकारामुळे जर अपघात होऊन जीवितहानी झाली तर यास कुणाला जबाबदार धरणार असा सवाल त्यांनी केला आहे.

Web Title: Unauthorized School Owner - File crimes against drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.