विनाअनुदानित शिक्षकांचा संप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:17 AM2017-08-06T04:17:29+5:302017-08-06T04:17:32+5:30
अनेकवेळा आंदोलने करुनही उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांना गेल्या १८ वर्षापासून स्केलप्रमाणे वेतन दिले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अशा सर्व शिक्षकांनी १ आॅगस्ट
विक्रमगड : अनेकवेळा आंदोलने करुनही उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांना गेल्या १८ वर्षापासून स्केलप्रमाणे वेतन दिले जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अशा सर्व शिक्षकांनी १ आॅगस्ट पासून आझाद मैदान, मुंबई येथे काम बंद आंदोलन सुरु केले आहे. १० आॅगस्टपासून या विद्यार्थ्याची प्रथम घटकचाचणी सुरु होत आहे. मात्र या आंदोलनामुळे अध्यापनात खंड पडला आहे़ विक्रमगड मधील छत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी शिक्षकांच्या पगारासंदर्भात असलेल्या मागण्यांचा विचार करावा व शाळा कॉलेज पूर्ववत चालू करावे, यासंदर्भात आज तहसिलदार व गटविकास अधिकाºयांना निवेदन दिले आहे़
उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांना गेल्या १८ वर्षांपासून श्रेणीनुसार वेतन दिले गेले नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. आहे ती नोकरी सोडवत नाही आणि तिच्यातून मिळणाºया वेतनात पोट भरत नाही. अशी अवस्था आहे. जे काही तुटपुंजे वेतन दिले जाते, ते ही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागत आहेत़ दुसरे कर्ज देंखील मिळत नसल्याने शिक्षकांवर मात्र आता उपासमारीची वेळ येवुन ठेपली आहे़
या संस्था कायम स्वरुपी विनाअनुदानित या तत्वावर सुरु झाल्याने या शिक्षकांच्या समस्यांकडे कुणीही लक्ष देत नाही. अनुदान नाही म्हणून श्रेणीनुसार वेतन नाही असा पवित्रा संस्थाचालकांनी घेतला आहे.