विनाअनुदानित शिक्षकांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:25 AM2017-07-19T02:25:03+5:302017-07-19T02:25:03+5:30
महाराष्ट्रातील केवळ २२,५०० उच्च माध्यमिक शिक्षकांना गेल्या १८ वर्षापासून स्केलचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको व सर्व कॉलेज
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : महाराष्ट्रातील केवळ २२,५०० उच्च माध्यमिक शिक्षकांना गेल्या १८ वर्षापासून स्केलचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात रास्ता रोको व सर्व कॉलेज, शाळा बंद ठेवून आंदोलन करण्यात आले व याबाबतची लेखी निवेदने शासनापर्यत पोहविण्यासाठी त्यांच्या प्रती तहसिलदार, शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक संघटना समित्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी व शिक्षक तसेच पदवीधर आमदार यांना देण्यात आली असल्याची माहिती राज्य अध्यक्ष प्रा़ टी़ एम़ नाईक यांनी दिली़
विक्रमगड तालुक्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांचे श्रेणीनुसार वेतन गेली १८ वर्षे दिले गेले नसल्याने शिक्षकांनी आखलेले बजेट पुरते कोलमडून गेले आहे़ आज हातामध्ये पुरेसा पैसा नाही काम करुन घेतले जात आहे़ एवढया महिन्याचा पगार मिळत नसल्याने या शिक्षकांचे मासिक वेतनही दर महिन्याच्या होत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागत आहेत़
गेल्या अनेक महिन्यांपासून ही परिस्थिती असल्याने त्यांचे कौटुंबिक अर्थकारण कोलमडले आहे. पगार मिळत नसल्याने उसनवारी करुन घरखर्च भागवावा लागत आहेत़ आज उसनवारी करुन करुन डोक्यावर भला मोठा कर्जाचा डोंगर झाला आहे आणि आता कर्ज फेडू शकत नसल्याने दुसरे कर्ज देखील मिळकत नसल्याने आल हया शिक्षकांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे़
आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ १०० हून अधिक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे़ गेली १८ वर्षापासून २२५०० शिक्षकांना पगार मिळत नाही, जर या आंदोलनाची दखल घेवून आॅगस्टच्या पहिल्या आठवडयात प्रस्ताव सादर केले गेले नाही व हा प्रश्न सोडविला गेला नाही तर येत्या अधिवेशनाच्यावेळी शाळा कॉलेज बंद करुन आझाद मैदानावर येऊन ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. -प्रा़ टी़ एम पाईक,
राज्य अध्यक्ष