कांदळवनात उभारले बेकायदा गोदाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:53 AM2017-08-02T01:53:43+5:302017-08-02T01:53:43+5:30
मीरा रोड : भार्इंदरच्या नवघर येथे कांदळवनात बेकायदा उभारलेल्या चौधरी डेकोरेटाच्या गोदामाच्या ठिकाणी टाकलेल्या डेब्रिजचे सपाटीकरण करताना जेसीबीसह टेम्पो पाणथळ तक्रार निवारण समितीने जप्त करून चालकांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
जिल्हाधिकाºयांनी मीरा- भाईंदरमधील कांदळवन व पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीने शनिवारी मुर्धा खाडी परिसर, बामणदेव नगर, आरएनपी पार्क, सरस्वती नगर, शिवशक्ती नगर - नवघर येथील पाहणी केली. या वेळी जागोजागी कांदळवनाचा ºहास करून बेकायदा भराव व बांधकामे आढळली. रिलायन्सच्या अधिकाºयांनाही वीज जोडण्या खंडित करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, नवघर येथील कांदळवन - सीआरझेड १ क्षेत्राने बाधित विश्वकर्मा वाडी व परिसराची पाहणी करताना चौधरी डेकोरेटरने कांदळवनात उभारलेले बेकायदा गोदाम आढळले. त्या ठिकाणी झाडांच्या फांद्या तोडलेल्या तसेच जेसीबीने डेबिज पसरवण्याचे काम सुरू होते. तर टेम्पोमध्ये सामान भरले जात होते.
समितीचे सचिव व नायब तहसीलदार पंढरीनाथ भोईर, मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार, बंदर निरीक्षक सुप्रिया बनकर, वन विभागाचे देशमुख, निचिते, साळवे, मोरे, मंसुरी यांच्यासह पीआरपीचे सुनील भगत आदींनी जेसीबी व टेम्पो जप्त करून चालकांना नवघर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक राम भालसिंग यांनी वाहने जप्त करून गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली.