स्टेट बॅँकेसमोर बेशिस्त पार्किंग, वाहतूककोंडी
By Admin | Published: April 1, 2017 11:28 PM2017-04-01T23:28:20+5:302017-04-01T23:28:20+5:30
या शहरात गावाच्या मध्यभागी असलेल्या स्टेट बॅँकेंसमोर केल्या जात असलेल्याबेशिस्त पार्र्किंगमुळे सतत वाहतूककोंडी होत असून त्यामुळे नागरीकांत
जव्हार : या शहरात गावाच्या मध्यभागी असलेल्या स्टेट बॅँकेंसमोर केल्या जात असलेल्याबेशिस्त पार्र्किंगमुळे सतत वाहतूककोंडी होत असून त्यामुळे नागरीकांत तीव्र संताप निर्माण झाला आहे. या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे, विशेष म्हणजे बॅँकेच्यासमोरच े पोलीस स्टेशन असूनही आजपर्यत एकही वाहनांवर कारवाई झालेली नाही, त्यांचेकडून फक्त बघ्याची भूमिका घेतली जाते.
स्टेट बॅँकेत दररोज खूपच गर्दी होत असते. असलेली जागा अपुरी पडते त्यामुळे ग्राहकांच्या रांगा रस्त्यापर्यंत जातात. त्यात बेशिस्त पार्किंगची भर पडते. गेट समोर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकालासुध्दा वाहनचालक दाद देत नाहीत, त्यामुळे या मार्गवर नेहमीच वाहतूक वर्दळ होऊन कित्येकदा वाहनांचे अपघात होतात. आठवड्यातून ३ दिवस उजव्या तर तीन दिवस डाव्या बाजूस वाहने पार्क करावीत असे फलक लावले आहेत परंतु त्याची अंमलबजावणी कुणीही करीत नाहीत. (वार्ताहर)