विक्रमगडला मंगळवारी भरली विना दप्तर शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:57 AM2017-08-02T01:57:41+5:302017-08-02T01:57:41+5:30
येथील केंद्रशाळेमध्ये मंगळवारी विना दप्तर शाळा म्हणजेच पालघर जिल्हा वर्धापन दिन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त
राहुल वाडेकर ।
विक्रमगड : येथील केंद्रशाळेमध्ये मंगळवारी विना दप्तर शाळा म्हणजेच पालघर जिल्हा वर्धापन दिन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपनिरिक्षक विश्वास पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे प्रशांत भानुशाली, मुख्याध्यापक भडांगे, , शिक्षक, आदींची उपस्थिती होतीे
दिवसभर या शाळेमध्ये प्रभातफेरी पाहुण्याचे स्वागत, वर्धापन दिन सोहळा, लो़ टिळक पुण्यतिथी कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, रांगोळी, निबंध स्पर्धा, फनी गेम्स व समारोप अशा प्रकारे दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याने येथील ३५० विदयार्थ्याना आज विना दप्तर शाळेत बोलविण्यात आलेले होते़ यावेळी विदयार्थ्यांनी लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे यांच्या चरित्राची माहिती देणारी भाषणे मान्यवरांनी केलीत. या विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरिक्षक विश्वास पाटील यांनी समारोपाच्या वेळी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.