वाहतूककोंडीवर वाहनतळाचा उतारा

By admin | Published: October 1, 2016 03:15 AM2016-10-01T03:15:22+5:302016-10-01T03:15:22+5:30

वरसोवा पुलाच्या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुजरात येथून येणाऱ्या वाहनांकरिता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील सुमारे

Underground Transcript | वाहतूककोंडीवर वाहनतळाचा उतारा

वाहतूककोंडीवर वाहनतळाचा उतारा

Next

तलासरी/ठाणे : वरसोवा पुलाच्या कामामुळे होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गुजरात येथून येणाऱ्या वाहनांकरिता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील सुमारे १४ एकर जागेवर २००० गाडया उभ्या राहू शकतील एवढया क्षमतेचे वाहनतळ सोमवारपर्यंत कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्र वारी दिली.
दापचारी आणि आच्छाड येथील दुग्धविकास आणि आरटीओ यांच्या ४ जागांवर हे वाहनतळ उभारण्यात येणार असल्याने ठाणे, कल्याण, भिवंडी बायपास, पालघर, वसई तसेच, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सर्व प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच, वाहतूक नियंत्रित करण्याकरिता मनोर फाटा व चिंचोटी येथे कंट्रोल रूम उभारण्यात यावे व त्यांच्या सूचनेनुसार गुजरातकडून येणारी वाहने नियंत्रित करण्याच्या सूचना करीत वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ही जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे शिंदे म्हणाले. वरसोवा पुलाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन ती टाळण्याकरीता झालेल्या बैठकीत विशेष वाहनतळ उभारण्यात येऊन जेएनपीटी व गुजरातकडून येणारी वाहने नियंत्रित करून रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळावी अशी सूचना केल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी हा पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी सार्वजनिक बांधकाम, एमएसआरडीसी, पोलीस व वाहतूक पोलीस अधिकारी तहसीलदार, प्रांत आदी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

तळावर स्वच्छ पाणी व अंघोळीची सोय
वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याकरिता सर्व यंत्रणांनी संयुक्त पणे काम करण्याची गरज असून पोलिसांनी मनुष्यबळ वाढवावे याकरिता महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून अतिरिक्त मनुष्यबळ मिळावे, याकरिता त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणे झाले असून त्यांनी होकारही दिला असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
तर उभारण्यात येणाऱ्या वाहनतळावर स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी तसेच शौचालयांची व्यवस्थेबरोबर ड्रायव्हर यांना अंघोळीकरिता हौद बांधण्यात यावा. तसेच, रु ग्णवाहिकांसाठी ग्रीन कॉरिडॉर देखील राबवण्यात यावे जेणे करून या वाहतूक कोंडीमुळे रु ग्णवाहिकांना कोणताही अडथळा होऊ नये असे त्यांनी सांगितले.

गाड्या पास करणाऱ्या टोळ्यांची समस्या
चारोटी, दापचारी, तलासरी येथील ग्रामस्थांनी चारोटी, दापचारी तपासणी नाका येथे मोठी वाहतूक कोंडी होते यावर उपाय योजना करण्याचे सांगितले. दापचरी तपासणी नाका येथे अवजड वाहने पास करणाऱ्या अनेक टोळ्या असून ग्रामस्थांना धमकावून या टोळ्या वाहने पास करतात याबाबत तक्रार केली. विशेष म्हणजे आर.टी.ओ, सदभावचे सुपरवायजर यांची हात मिळवणी असल्याचेही ते म्हणाले.

पोलिसांवरील हल्ल्याचाही विषय मांडला
तसेच या तपासणी नाक्यावर या टोळ्या दिवसरात्र घोळक्याने उभ्या असतात. याच्या कडून ग्रामस्थांना धमकवण्याचे प्रकार होतात तसेच पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार घडल्याचे निदर्शनात आणून देताच यावर कारवाई करण्याचे निर्देश मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या तपासणी नाक्यावरील टोळ्या नेस्तनाबूत केल्यास दापचारी तलासरी भागात शांतता प्रस्थापित होईल असे ग्रामस्थांनी सांगितले.

Web Title: Underground Transcript

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.