डहाणूतील पारंपरिक फुगे कारखाने मृत्युपंथाला, हजारो कामगारांवर बेकारीची कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 02:11 AM2018-08-12T02:11:31+5:302018-08-12T02:11:46+5:30

हजारो भूमीपुत्रांना रोजगार देणाऱ्या फुगे कारखान्यांची अवस्था दयनिय झाली आहे. शासनाच्या आडमूठ्ठ्या धोरणामुळे त्यांची मुस्कटदाबी होत आहे.

unemployment thousands of workers | डहाणूतील पारंपरिक फुगे कारखाने मृत्युपंथाला, हजारो कामगारांवर बेकारीची कु-हाड

डहाणूतील पारंपरिक फुगे कारखाने मृत्युपंथाला, हजारो कामगारांवर बेकारीची कु-हाड

Next

- शौकत शेख
डहाणू - या परिसरातील हजारो भूमीपुत्रांना रोजगार देणाऱ्या फुगे कारखान्यांची अवस्था दयनिय झाली आहे. शासनाच्या आडमूठ्ठ्या धोरणामुळे त्यांची मुस्कटदाबी होत आहे. उद्योग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्या आधारे अत्याधुनिक मशीनव्दारे उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या फुगे कारखाने धारकांना जागतिक बाजारपेठेत विकसीत झालेली आॅटोमॅटीक लाईन मशीन आपल्या कारखान्यात बसविणे डहाणूच्या उद्योगबंदीमुळे शक्य होत नाही.
गेल्या तीन वर्षापासून असंख्य कारखाने मृत्यूशय्येवर असल्याने येत्या काही महिन्यात आणखीही अनेक कारखाने बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी येथील हजारो मजूर, कुशल, अकुशल कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळणार आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी याकडे लक्ष देऊन आजारी असलेल्या या कारखानदारांना जीवदान देण्याची मागणी उद्योजक रविंद्र फाटक यांनी केली आहे.
डहाणू तालुक्यात १९६२ पासून सुमारे दिडशे फुगे कारखाने होते. कच्चा रबरावर पक्रिया करून पारंपरिक पध्दतीने उत्पादीत केल्या जाणाºया डहाणू च्या मनमोहक रंगबेरंगी फुग्याला भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी होती. त्या मुळे रात्रंदिवस सुरू असलेल्या या कारखान्यात सुमारे पंधरा ते वीस हजार कामगारांना रोजगार मिळत होता. परंतु जागतिक बाजरपेठेत दररोज वाढणारे रबराचे दर, तशातच चायना तसेच श्रीलंका येथील दर्जेदार, टिकाऊ, फॅन्सी आणि स्वस्त फुग्यांच्या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस डहाणूतील फुग्यांची मागणी कमी होऊन असंख्य कारखाने आर्थिक संकटात सापडून बंद पडू लागले. विशेष म्हणजे सध्या चायनीज व श्रीलंकेच्या फुग्यांना खूप मागणी आहे. डहाणूच्या फुग्यांच्या तुलनेत ते प्रंचड स्वस्त आहे. त्याचे कारण म्हणजे येथील फुगे कारखाने धारक पारंपरिक पध्दतीने उत्पादन घेते. तर चायना व श्रीलंका येथे आॅटोमॅटीक लाईन मशीन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसीत झालेल्या मशीनवर फुग्यांचे उत्पादन घेतले जाते. कमी वेळात व कमी खर्चात दूप्पट, तिप्पट उत्पादन देणाºया या मशीनची किंमत दोन कोटी आहे.
डहाणू तसेच परिसरात सध्या पंचवीस ते तीस फुगे कारखाने असून त्यातील निम्मेपेक्षा अधिक कारखाने महिन्यातून केवळ पंधरा दिवस सुरू असतात. पालघर जिल्हयातील गौण खनिज व डहाणू तालुक्यातील उद्योगबंदी बरोबरच हजारो हातांना रोजगार देणाºया फुगे कारखान्यांकडे कोणीही गांभिर्याने पाहत नसल्याने डहाणूत सुशिक्षित बेरोजगारांबरोबरच मोलमजूरी करून उदनिर्वाह करणाºया आदिवासींवर बेरोजगारीची पाळी आली आहे. डहाणूत केंद्र सरकारने १९९१ मध्ये एका अधिसुनेव्दारे उद्योगबंदी लादल्याने गेल्या २४ वर्षात येथे कोणताही नवीन प्रकल्प, किंवा एक ही कारखान सुरू झालेला नाही

१९९१ ची अधिसूचना येते आहे, फुग्यांच्या कारखान्यांच्या मुळावर

येथील कारखानदारांनी शासनाकडे नवीन आॅटोमॅटीक लाईन मशीन साठी परवानगी मागितली. परंतु केंद्र शासनाच्या १९९१ च्या अधिसूचनेकडे डहाणू तालुका पर्यावरण प्रधिकरणाने बोट दाखविल्याने उहाणू फुगे कारखानदार संकटात सापडले आहेत.

उद्योगबंदीमुळे गेल्या २८ वर्षात नवीन पिठाची चक्की देखील चालू होऊ शकलेली नाही. एका बाजुला सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांनाच हजारो गोर-गरीब आदिवासी मजूरांना रोजगार देणारे फुगे कारखाने बंद पडत असल्याने भूमीपुत्रांत संताप आहे.

Web Title: unemployment thousands of workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.