तीन विद्यार्थ्यांना युनेस्कोचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:40 AM2020-02-03T00:40:38+5:302020-02-03T00:41:19+5:30
राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षक यांना युनेस्को स्कूल क्लब चळवळीचा लाभ मिळावा यासाठी मागील वर्षी राज्यव्यापी युनेस्को स्कूल क्लब चळवळ सुरू केली.
डहाणू/बोर्डी : वर्ल्ड फेडरेशन आॅफ युनेस्को क्लबमार्फत आयोजित मित्सुबिशी एशियन चिल्ड्रेन इंकी फेस्टा २०१९-२० स्पर्धेत देशातील १० हजार ५८८ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील २५ शाळा सामील झाला होत्या. त्यात तीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.
संदेश संदीप बाबर (जि.प.शाळा पावळेपाडा, गांधीधाम, मार्गदर्शक शिक्षक रवींद्र जाधव), ऋतिका सुभाष वनगा (जि.प.शाळा आगवन शिशुपाडा, मार्गदर्शक शिक्षक वरुणाक्षी आंद्रे), सुशांत रमेश भुसारा (जे.एम.टी. हायस्कूल वाणगांव, मार्गदर्शक शिक्षक रूपेश वझे) यांचा यात समावेश आहे. सर्व विजेत्यांचे, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांचे गटशिक्षणाधिकारी विष्णू रावते यांनी अभिनंदन केले आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षक यांना युनेस्को स्कूल क्लब चळवळीचा लाभ मिळावा यासाठी मागील वर्षी राज्यव्यापी युनेस्को स्कूल क्लब चळवळ सुरू केली. या वर्षी राज्यातील एकूण पंचवीस विद्यार्थ्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती युनेस्को स्कूल क्लब चळवळचे राज्य समन्वयक विजय बाळासाहेब पावबाके यांनी दिली.