चिंचणींच्या प्रमोद दवणे यांचा अनोखा उपक्र म , बहात्तर गणेश मूर्तीचे केले पुन्हा विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 05:05 AM2017-08-28T05:05:21+5:302017-08-28T05:05:31+5:30
विसर्जनानंतर किना-यावर भरतीवाटे वाहत येऊन अस्तव्यस्त पसरलेल्या मूर्तीं व त्यांचे अवशेष एकत्र करून खोल समुद्रात पुन्हा विसर्जन करण्याचा अनोखा उपक्रम चिंचणीचे प्रमोद दवणे मागील दहा वर्षांपासून राबवत असून आज सकाळी त्यांनी ७२ गणेश मूर्तीचे विसर्जन केले.
पंकज राऊत/ शौकत शेख
बोईसर : विसर्जनानंतर किना-यावर भरतीवाटे वाहत येऊन अस्तव्यस्त पसरलेल्या मूर्तीं व त्यांचे अवशेष एकत्र करून खोल समुद्रात पुन्हा विसर्जन करण्याचा अनोखा उपक्र म चिंचणीचे प्रमोद दवणे मागील दहा वर्षांपासून राबवत असून आज सकाळी त्यांनी ७२ गणेश मूर्तीचे विसर्जन केले.
दिड दिवसांपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत समुद्रात विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती दुसºया दिवशी भरती बरोबर समुद्र किनारी वाहत येतात त्या सर्व मूर्तींना एकत्र करून बैल गााडीमध्ये भरून खोल समुद्रात विसर्जन करून खºया अर्थाने परिपूर्ण विसर्जनाचे महत्त्वाचे काम ते करीत आहेत. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीला श्री गणरायाचे घरोघरी आणि ठीक ठिकाणी मोठया उत्साहात भक्ती भावाने व तेवढयाच जल्लोषात स्वागत करून गणरायाला आकर्षक मखरामध्ये विराजमान करुन त्याची पूजा-अर्चा होते. त्यानंतर दीड, अडीच, पाच, सात, ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीचे विसर्जन होत असते.
गणपतीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत निर्विघ्नपणे सर्व कार्य पार पाडल्याच्या समाधानात भक्त दैनंदिन व्यापात व्यस्त होतात. परंतू त्याच वेळी प्रमोद दवणे हे पहाटे चिंचणीपासून दांडयापर्यंत समुद्र किनाºयावर दिड ते दोन किलोमीटर फिरून आदल्या दिवशी विसर्जन केलेल्या मूर्तीपैकी भरती वाटे किनारी लागलेल्या मूर्ती एकत्र करून बाप्पांचे परिपूर्ण विसर्जन करतात.