मनसेचे खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन

By admin | Published: October 12, 2016 03:46 AM2016-10-12T03:46:41+5:302016-10-12T03:46:41+5:30

शहरात ठिकठिकाणी पडलेल खड्ड्यांविरोधात मनसेने मंगळवारी अनोखे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी खड्ड्याातील पाण्याने आंघोळ केली

Unique movement against MAS pits | मनसेचे खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन

मनसेचे खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन

Next

वसई : या शहरात ठिकठिकाणी पडलेल खड्ड्यांविरोधात मनसेने मंगळवारी अनोखे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी खड्ड्याातील पाण्याने आंघोळ केली. तर महिला कार्यकर्त्यांनी खड्ड्यांभोवती रांगोळया काढल्या.
वसई विरार परिसरात अनेक भागात मोठाले खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवाच्या आधी पालिकेने काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या पावसाने रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले असून ठेकेदाराचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
दोन दिवसांपूर्वी मनसेने पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन खड्ड्याला जबाबदार असलेल्या अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांविरोधात हे आंदोलन केले. (वार्ताहर)

Web Title: Unique movement against MAS pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.