सक्शनद्वारे बेछूट रेती उपसा
By admin | Published: March 22, 2017 01:12 AM2017-03-22T01:12:58+5:302017-03-22T01:12:58+5:30
वसई पूर्व भागात महसूल विभागाने झोपेचे सोंग घेतल्याने पारोळ, आडणे, परिसरातील तानसा नदीत सक्शनने अवैध रेती उत्खनन
पारोळ : वसई पूर्व भागात महसूल विभागाने झोपेचे सोंग घेतल्याने पारोळ, आडणे, परिसरातील तानसा नदीत सक्शनने अवैध रेती उत्खनन जोरात सुरु आहे. त्यामुळे या परिसरातील निसर्गाची मोठी हानी होते आहे. तसेच नदीतील पाणी दूषित झाले आहे.
काही वर्षा पूर्वी तानसा नदीचा काठ सुपीक असल्याने मोठ्याप्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन शेतकरी घेत होते. तसेच या भागातील काशीचीवांगी प्रसिद्ध होती. त्यामुळे आदीवासीना चांगला रोजगार ही मिळत असे. सध्या मात्र येथे जवळपास दहा सेक्शन पंपाद्वारे रेती उत्खनन होत असल्याने किनारपट्टच्या सुपीक जमिनीवर त्याचे दुष्परिणाम झाले आहेत.
यावर वसईचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांनी पारोळ आडणे परिसरातील तानसा नदीत सक्शन पंपा व्दारे होणाऱ्या रेती उत्खनन वर तत्काळ कारवाई करणार आहोत असे लोकमतला सांगितले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नदीकिनारी पहाऱ्याला बसलेले पोलीस काय करतात हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता तहसीलदार बोलल्याप्रमाणे कारवाई करतात की, सोयीस्कररित्या विसरून जातात, याकडे लक्ष लागले आहे. ़(वार्ताहर)