भास्कर ठाकूर यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:39 PM2018-10-30T22:39:22+5:302018-10-30T22:42:50+5:30

श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष भास्कर वामन ठाकूर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण त्यांच्या भगिनी पद्मावती यशवंत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.

The unveiling of the memorial of Bhaskar Thakur | भास्कर ठाकूर यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण

भास्कर ठाकूर यांच्या अर्धपुतळयाचे अनावरण

googlenewsNext

नालासोपारा : विरार येथील श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष भास्कर वामन ठाकूर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण त्यांच्या भगिनी पद्मावती यशवंत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. भास्करराव वामन ठाकूर शिक्षण संकुलात हा सोहळा पार पडला. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

त्यांच्या ३० आॅक्टोबर रोजी दहावा स्मृतिदिनी श्री जीवदानी देवी संस्थान व जीवदानी एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजिला होता. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी खासदार बळीराम जाधव, महापौर रूपेश जाधव, जीवदानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजीव पाटील, प्रथम महिला महापौर प्रविणा ठाकूर,उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष पंकज ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार विलास तरे, माजी आमदार डॉमनिक घोन्साल्वीस, जीवदानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र गावड, मुंबई युनव्हर्सिटीचे रजिस्ट्रार कांबळी, बबन नाईक, नंदन पाटील,विकास वर्तक, हरिहर बाबरेकर, नारायण मानकर, आर.एम.पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी जीवदानी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून होत असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्र माबद्दल माहिती दिली. जीवदानी देवीचा गड पूर्वी उजाड होता, तो हरीत करण्यात ठाकूर यांचा मोलाचा सहभाग असल्याचे सांगितले. आज ट्रस्टच्या माध्यमातून फिरता दवाखाना, नेत्रचिकित्सा, सामुदायिक विवाह सोहळा, डायलेसीस सेंटर चालवले जाते. हा सर्व खर्च ट्रस्टच्या दानातून केला जात असतो. ट्रस्टची शाळा असावी हा विचार पुढे आल्यावर विरार पूर्व येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली. तिला भास्कर ठाकूर यांचे नाव देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. आज त्याच शिक्षण संकुलात त्यांचा पुतळा उभारला गेला आहे ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे असे त्यांनी सांगितले.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, येत्या काळात एज्युकेशन हब हे मूंबई पूणे नसून विरार होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी दिले.
आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही, आठवणींना उजाळा दिला. प्रतिकृल परिस्थितीशी सामना करत आंम्ही पुढे आलो. चांगलं करणाऱ्यांना कायम लक्षात ठेवा, त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव
झाल्याने आनंद होत आहे. हितेंद्र हे माझे नाव त्यांनी दिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

प्रतिकृल परिस्थितीशी सामना करत आंम्ही पुढे आलो. चांगलं करणाºयांना कायम लक्षात ठेवा, ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव झाल्याने आनंद होत आहे.
- हितेंद्र ठाकूर, आमदार, वसई विधानसभा

त्यांनी जीवदानी देवी ट्रस्टवर असताना खºया समाजसेवेला सुरूवात केली. विरारचे सरपंच, माजी नगराध्यक्ष असलेल्या भास्कररावांच्या समाजसेवेचा आज यथोचित गौरव केला गेला आहे. - राजीव पाटील,
अध्यक्ष, जीवदानी एज्युकेशन सोसायटी

Web Title: The unveiling of the memorial of Bhaskar Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.