ग्रामसेविका सुचिता पाटील यांच्यावर ‘उपोषणास्त्र’

By admin | Published: January 28, 2017 02:33 AM2017-01-28T02:33:30+5:302017-01-28T02:33:30+5:30

सफाळ्याजवळील कपासे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुचिता पाटील या राजकीय दबावाला बळी पडत मनमानी कारभार करीत असल्याने

'Upokshtra' on Gramsevika Sucheta Patil | ग्रामसेविका सुचिता पाटील यांच्यावर ‘उपोषणास्त्र’

ग्रामसेविका सुचिता पाटील यांच्यावर ‘उपोषणास्त्र’

Next

पालघर : सफाळ्याजवळील कपासे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुचिता पाटील या राजकीय दबावाला बळी पडत मनमानी कारभार करीत असल्याने गावाचा विकास ठप्प पडल्याच्या निषेधार्थ सरपंचासह ग्रामस्थांनी पालघर पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. पंचायत समितीच्या वतीने ग्रामसेविकेची चौकशी करून बदली करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर तूर्तास हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
२५ जानेवारी २०१३ पासून सरपंच म्हणून गजानन पागी यांची निवड झाली. मात्र, ग्रामसेविका सुचिता पाटील यांनी असहकार व मनमानी कारभार केल्याने विकासास अडथळा निर्माण झाल्याचा कांगावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. काही विशिष्ट भागाचा विकास व इतरांवर अन्याय, प्रशासकीय लालफितीमुळे अनेक विकासकामे ठप्प पडणे, राजकीय दबावाने प्रेरित होऊन काम करणे, ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न करणे, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. अशा तक्रारी पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे केल्या होत्या. मात्र, ग्रामसेविकेवर कुठलीही कारवाई होत नसल्याने शेवटी सरपंचासह सत्ताधारी सदस्य व ग्रामस्थांनी गुरुवारपासून पालघर पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले होते. त्यानंतर सहायक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, विस्तार अधिकारी अप्पाराव ढाडाळे, अमृत उमतोल यांनी त्यांची भेट घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Upokshtra' on Gramsevika Sucheta Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.