वसुली कर्मचाऱ्याचे जि.प.समोर उपोषण
By admin | Published: February 20, 2017 05:23 AM2017-02-20T05:23:47+5:302017-02-20T05:23:47+5:30
वाडा ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांच्या भ्रष्टाचारा संदर्भातील चौकशी आणि सुधारित किमान वेतन दर लागू
पालघर : वाडा ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांच्या भ्रष्टाचारा संदर्भातील चौकशी आणि सुधारित किमान वेतन दर लागू करण्यासंदर्भातील आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ वाडा ग्रामपंचायतींचे वसुली कर्मचारी सचिन रसाळकर ह्यांनी जिल्हा परिषद कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
वाडा ग्रामपंचायती चे कर्मचारी रसाळकर यांनी वाडा ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी अर्जुन इंगोले आणि सरपंच उमेश लोखंडे यांनी उत्पन्नाची बाब विचारात न घेता अनिधकृत रित्या नोकर भरती केली असून मला सुधारित किमान वेतन दर लागू कारण्यासंदर्भात तारापुरच्या कामगार उपयुक्त आणि विभागीय उपयुक्त (आस्थापना) याना कळविल्या नंतर त्यांनी सीईओ चौधरी यांना कळविले होते. त्यांनी बीडीओंना सुधारित किमान वेतन लागू करण्याचे आदेश पारित केल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी आदेश देऊनही सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी ह्यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे डिसेंबरमध्येच त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. (प्रतिनिधी)
निलंबनाची मागणी
सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्या विरोधात कारवाई होत नसल्याने आणि ह्या प्रकरणात त्यांना मदत करणाऱ्या वाड्याचे गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे याना त्वरित निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे, ह्या मागणी साठी रासाळकरांनी जिल्हा परिषदे समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.