ओमकार अकादमीत आदिवासींना यूपीएससीचे प्रशिक्षण मोफत

By admin | Published: September 12, 2016 02:57 AM2016-09-12T02:57:22+5:302016-09-12T02:57:22+5:30

युपीएससी आणि एमपीएससी या परीक्षांमधील यशाची द्वारे खुली करणारे प्रशिक्षण आदिवासी युवक, युवतींना खुली करून देणाऱ्या ओमकार अकादमीचे उद्घाटन झडपोली

UPSC training for tribals in Omkar Academy free | ओमकार अकादमीत आदिवासींना यूपीएससीचे प्रशिक्षण मोफत

ओमकार अकादमीत आदिवासींना यूपीएससीचे प्रशिक्षण मोफत

Next

हितेन नाईक,  पालघर
युपीएससी आणि एमपीएससी या परीक्षांमधील यशाची द्वारे खुली करणारे प्रशिक्षण आदिवासी युवक, युवतींना खुली करून देणाऱ्या ओमकार अकादमीचे उद्घाटन झडपोली येथे शनिवारी करण्यात आले. निलेश सांबरे यांनी तिचा शुभारंभ केला असून अशा स्वरुपाचा देशातला हा पहिलाच उपक्रम आहे.
तिचे उद्घाटन तुलसीदास भोईटे यांच्या हस्ते तर तीमधील ग्रंथालयाचे उद्घाटन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रमाकांत पाटील व किरण शेलार यांच्या हस्ते पार पडले.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सूत्रधार निलेश सांबरे यांनी जिल्ह्यातील आदिवासी, गरीब अशा हुशार युवक व युवतींना आयएएस व आयपीएस अधिकारी बनविण्याचा दृढ निश्चय मनात बाळगला असून त्यांच्या अ‍ॅकेडमीमध्ये आलेल्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांमधून ६० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी निवडण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना हे संपूर्ण प्रशिक्षण तज्ज्ञ शिक्षकांद्वारे विनामूल्य देण्यात येणार असून सुसज्ज लायब्ररीहीआहे.
सांबरे यांच्या घरात वैभव असतांना त्यांनी आपण ज्या भागात शिकलो, वाढलो तेथील आदिवासी आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना आयएएस आणि आयपीएस बनविण्यासाठी उचललेला वसा समाजासाठी आदर्श ठरणारा आहे असे गौरोवोद्गार मान्यवरांनी काढले.
कार्यक्रमात पूर्वा भोईर या ८ वर्षीय मुलीने समाजाला प्रबोधन करणारे व्याख्यान दिले. जिजाऊ माँ शनि चौथऱ्यावर जाऊन शनी देवांचे दर्शन घेण्याचा हट्ट घेऊन बसल्या असत्या तर स्वराज्य निर्माण झाले नसते. अशी अनेक उदाहरणे देऊन प्रबोधन केले. प्राध्यापक सुनील माधव परदेशी, पत्रकार रमेश पाटील,विजय घरत, नितीन बोंबाडे आदि मान्यवरांसह विद्यार्थी,पालकवर्ग उपस्थित होते.

Web Title: UPSC training for tribals in Omkar Academy free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.