जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिमेला उत्साहात प्रारंभ, डाॅ. सागर पाटील यांना दिला पहिला डाेस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 08:09 AM2021-01-17T08:09:33+5:302021-01-17T08:10:40+5:30
पालघर : देशभरात शनिवारपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून पालघर ग्रामीण रुग्णालय येथे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक ...
पालघर : देशभरात शनिवारपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून पालघर ग्रामीण रुग्णालय येथे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करून लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे. पालघर जिल्ह्यात कोरोनाकाळात महत्त्वाची भूमिका बजावणारे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील यांचे प्रथम लसीकरण करून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
जिल्ह्यात शनिवारी पालघर ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय जव्हार, उपजिल्हा रुग्णालय डहाणू, वसई-विरार महापालिकेसाठी वरुण इंडस्ट्रीज अशा चार ठिकाणी लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
पहिल्या दिवशी एका केंद्रावर १०० कोरोना योद्ध्यांना ही लस देण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे १९ हजार ५०० डोस प्राप्त झाले आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात सोळा हजार आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर हे लसीकरण केले जाणार आहे.