वसईला काँग्रेसचा घंटानाद, तर राष्ट्रवादीची निदर्शने
By admin | Published: January 10, 2017 05:35 AM2017-01-10T05:35:11+5:302017-01-10T05:35:11+5:30
नोटंबदीविरोधात वसईत काँग्रेसच्या महिला आघाडीने तहसिल कचेरीसमोर घंटानाद केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन सादर केले
वसई : नोटंबदीविरोधात वसईत काँग्रेसच्या महिला आघाडीने तहसिल कचेरीसमोर घंटानाद केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन सादर केले.
या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे खूप हाल झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी यावेळी बोलताना केला. यावेळी कार्याध्यक्ष राजाराम मुळीक, मनीषा उके, अशफाक खान, डॉ.सुनिल रणाईत, सचिन कदम, रत्नदीप बने, राजेश शर्मा, विवेक परब, समिधा रावराणे, वैशाली भोसले, राधिका सिंग, सच्चिदानंद रावराणे, योगेश बिर्जे, अनिल पांडे, सिद्धिकी, छोटेलाल गुप्ता, शमीम काचवाला, आॅलीन वाझ, रुपेश सिन्हा आदी उपस्थित होते. काँग्रेसचे महिला आघाडीच्या वतीने तहसिल कचेरीसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनात आरती अनारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अॅलिस जॉन्सन, उषा पाठक, राधा अय्यर, श्रृती हटकर, निधा खिमाणी, संगीता मोरे, प्रवीणा चौधरी, रोहीणी कोचरेकर या महिला पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होत्या.