वसईतल्या विद्युतदाहिन्या निघाल्या भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:57 PM2018-10-31T22:57:55+5:302018-10-31T22:58:05+5:30

कोट्यवधी रुपयांचा झाला चुराडा; लाकडाचा सर्रास वापर, लाड म्हणतात जनजागृती करू

Vaishitav electrically discharged | वसईतल्या विद्युतदाहिन्या निघाल्या भंगारात

वसईतल्या विद्युतदाहिन्या निघाल्या भंगारात

googlenewsNext

विरार : प्रदूषण टाळण्यासाठी विरार वसई महापालिकेने स्मशानभूमीत लावलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विद्युत दहन यंत्रणा भंगार गेली असल्यामुळे महानगरपालिकेचा निष्काळजी पणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रात असणाऱ्या स्मशानभूमीतील मृतदेहांचे लाकडांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे म्हणून २०१४ साली महापालिकेने स्मशानभूमीवर विद्युत शरीरदहन यंत्रणा उभारली होती. मात्र त्याची महापालिकेकडून नीट देखरेख न झाल्याने आता त्या यंत्रणा भंगार अवस्थेत पडून आहेत. येवढा खर्च करून देखील प्रदूषणाची समस्या तशीच असल्याने स्मशानाच्या परिसरात राहणाºया सदनिकांना स्मशानातून निघणाºया धुराचा व वासाचा त्रास होत आहे. महापालिका अधिकाºयांनी कोणीही त्याचा वापर करीत नसल्याचे कारण देत या यंत्रणेची देखरेख न केल्याच्या कृतीला पुष्टी देत असले तरी त्यातून त्यांचा कामचुकारपणाच उघड होत आहे.

नालासोपारा पूर्व पश्चिम मधील स्मशानभूमीतील विद्युत शरीर दहन यंत्रणा खराब असल्याने येथे लाकडांचा वापर केला जातो, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचा त्रास होतो. धुराच्या चिमण्या उंचावर नसल्याने दुर्गंधी पसरते. तसेच परिसरातील लोकवस्ती वाढत चालल्याने प्रदूषण देखील वाढत आहे.

नागरिक शरीर दहन करण्यासाठी या यंत्रणेचा वापर नाकारतात त्यामुळे या मशीन बंद पडल्या आहेत. यासाठी जनजागृती अभियान चालवले जाणार आहे. आम्ही ही सेवा पुन्हा सुरु करणार असल्याचे पालिकेचे सार्वजनिक बांधकाम अभियंते राजेंद्र लाड यांनी लोकमला सांगितले. स्मशानभूमीतील लाकडांचा वापरात भ्रष्टाचार चालतो यामुळेच विद्युत शरीरदहन यंत्रणा अडगळीत पडल्याचे मनिष पवार यांनी सागितले.

Web Title: Vaishitav electrically discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.