वसईत यंदाही मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 11:42 PM2019-06-08T23:42:44+5:302019-06-08T23:43:07+5:30

दहावीचा निकाल ८२ .५७%। मुलांपेक्षा उत्तीर्णांची संख्या१० टक्क्यांनी अधिक

 Vaith is still a girl's bet | वसईत यंदाही मुलींचीच बाजी

वसईत यंदाही मुलींचीच बाजी

googlenewsNext

वसई : राज्यातील लाखो विद्यार्थी-पालक चातक पक्षाप्रमाणे ज्या दिवसाची वाट पाहत होते त्या दहावीच्या परीक्षेचा म्हणजेच माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शनिवारी सकाळी राज्य शिक्षण मंडळाने जाहीर करून याला पूर्णविराम दिला,तसेच त्यांनतर विद्याथ्यासाठी सविस्तर निकाल हा दुपारी १ वाजता आॅनलाईन पद्धतीने प्रसिद्ध हि झाला,

दरम्यान हा निकाल जाहीर होताच समोर यंदा ही वसई तालुक्यात मुलीनीच बाजी मारली असून तालुक्यात यंदा हि मुलाच्या 75.32 टक्केवारीच्या तुलनेत मुलींनी 85.23 टक्के निकाल प्राप्त करून पुन्हा एकदा आपली घोडदौड कायम ठेवली आहे. वसई तालुक्यात दहावीचा निकाल सरासरी 82. 57 टक्के इतका लागला असून एकूणच हा निकाल समाधानकारक असल्याचे विद्यार्थी ,पालक व शिक्षक वर्ग सांगत आहेत. तालुक्यात यंदा 259 शाळां मधून एकूण 30,259 मुले-मुली विद्यार्थ्यांनी दहावी च्या परीक्षेकरता नोंदणी केली होती, त्यातील 30,020 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. तर यापैकी 23 ,948 विद्यार्थी-विद्याथीनी उत्तीर्ण झाले , यंदा दहावीच्या परीक्षेस मुले व मुलीच्या आकडेवारीची माहिती घेता यावेळी 16258 मुले परीक्षेस बसली व त्यापैकी 12449 मुले उतीर्ण झाली. तर 13492 मुलींमध्ये 11499 मुली यावेळी उत्तीर्ण झाल्या आहेत, मात्र तरीही निकालाच्या गुणांची सरासरी टक्केवारी पाहता मुलांना 75.32 टक्के प्राप्त झाले आहेत तर मुलांच्या तुलनेत अधिक मुलींनी बाजी मारत तब्ब्ल 85.23 टक्के गुण प्राप्त करत पुन्हा एकदा वसई तालुक्यावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत वसई तालुक्यात बहुसंख्य शाळांचा निकाल हा 80 ते 90 टक्क्यांहून अधिक लागला आहे. सर्वाधिक कमी टक्केवारीत तालुक्यातील १२ शाळांचा समावेश. जी एन इंग्लिश स्कुल, वसई -२७.७९ टक्के, जगदीप विद्यमंदिर हायस्कुल ,वसई -३८ .१८ टक्के , इंदिरा गांधी विद्यालय ,गोखिवरे नालासोपारा -51 .32 टक्के, एव्हरग्रीन हायस्कुल ,नालासोपारा - 45 टक्के, लॉर्ड चाइल्ड हायस्कुल विरार पूर्व - 37.03 टक्के, थॉमस बेपिस्ट हायस्कुल ,पापडी वसई - 42 .22 टक्के, ऋषी वाल्मिकी विद्यलया,वसई - 50 टक्के, जयदीप विद्यामंदिर हायस्कुल, कारिगलनगर विरार - 50 टक्के, सेंट गोन्सालो गार्सिया इंग्लिश हायस्कुल किल्लाबंदर, वसई -45.45 टक्के, नवजीवन विद्यामंदिर हायस्कुल मोरेगाव ,विरार - 49.73 टक्के, गुरु कुल विद्यामंदिर मोरगाव, विरार - 42 .85 टक्के . मात्र तालुक्यातील सर्वाधिक कमी टक्केवारी असलेल्या विरार पूर्व महामार्गावरील भाताणे गावातील शासकीय मध्य आश्रमशाळा, बेलवाडी या शाळेचा निकाल अवघा 25.64 टक्के इतका लागला असल्याचे मुंबई बोर्डाच्या अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट होते.
न्यू इंग्लिश स्कुलची मनुश्री पाटील अव्वल ...
तर वसई गावातील प्रसिद्ध अशा बर्वे एजुकेशन म्हणजेच न्यू इंग्लिश स्कुलचा चा निकाल 79.52 टक्के लागला असून या शाळेतून मनुश्री प्रशांत पाटील हिला एकूण 475 गुण म्हणजेच 95 टक्के गुण मिळवून ती शाळेत पिहली आली आहे तर गौरव विश्वनाथ जोशी याला 468 गुण म्हणजेच 94 टक्के गुण मिळून तो शाळेत द्वितीय आला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक माणिकराव दुतोंडे यांनी लोकमत ला दिली, विशेष म्हणजे येथील वसई च्या स्टेला, सुयोगनगर मधील सेंट.नाझरेथ हायस्कुलने यंदाही आपली १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून या शाळेतून सारिका मेनन हि ९२.२ टक्के गुणांनी नाझरेथ हायस्कुल मधून पहिली आली आहे. वसई तालुक्याचा यंदाचा निकाल तसा उत्तम लागला असून अनेक शाळांचे विद्यार्थी पास होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

वसई तालुक्यात 20 शाळांचा निकाल 100 टक्के
वसई तालुक्यातील एकूण 259 शाळां पैकी 20 शाळांचा निकाल हा 100 टक्के इतका लागला असून यामध्ये सर्वाधिक 8 शाळा या वसई विभागात येत असून विरार-7 ,नायगाव -3, आणि सर्वाधिक कमी 2 शाळा या नालासोपाऱ्यात आहेत.१०० टक्के टक्क्यामधील शाळांची नावे...वसई -८ -जॉन हायस्कुल ,वसई , विद्याविकासिनी इंग्लिश हायस्कुल, गोखिवरे, वसई, होली पॅराडाइझ हायस्कुल ,वसई कार्मलाईट कॉन्व्हेंट सांडोर, वसई, नाझरेथ कॉन्व्हेंट हायस्कुल,सुयोगनगर ,वसई , सेंट एन्स कॉन्व्हेंट हायस्कुल नवघर,वसई, लुढानी विद्यमंदिर एव्हरशाईन,वसई पूर्व चंद्रराज विद्यामंदिर ,वसई नायगाव -३ सेंट झेविअर्स हायस्कुल ,नायगाव , सेंट फ्रान्सिस झविअर्स हायस्कुल ,नायगाव , संत ज्ञानेश्वर सरस्वती विद्यामंदिर -नायगाव पूर्व पाणजू विरार -7 एन जी वर्तक इंग्लिश हायस्कुल, विरार, गीतांजली विद्यामंदिर ,विरार मनवेलपाडा, कारमेल हायस्कुल ,विरार आगाशी, सेंट जेम्स हायस्कुल विरार, कुंभारवाडा , सेंट जोजेफ इंग्लिश हायस्कुल ,विरार ,नंदाखाल , यश विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल ,यशवंतनगर, विरार, सेंट एलिझाबेथ हायस्कुल, विरार नालासोपारा -2 क्लेरिझस हायस्कुल ,पाटणकर पार्क ,नालासोपारा , सेंट एन्स मिलेनियम इंग्लिश हायस्कुल ,नालासोपारा.

Web Title:  Vaith is still a girl's bet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.