झडपोलीची मल्ल मनाली होते आहे टोकियो ऑलिंपिकसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:43 AM2019-01-01T00:43:39+5:302019-01-01T00:51:01+5:30
- हितेंन नाईक पालघर : जिल्हा, राज्य स्पर्धांबरोबरच अनेक स्पर्धा गाजवीत जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्था, झडपोलीची कन्या मनाली जाधव ...
- हितेंन नाईक
पालघर : जिल्हा, राज्य स्पर्धांबरोबरच अनेक स्पर्धा गाजवीत जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्था, झडपोलीची कन्या मनाली जाधव ही कुस्तीपटू सध्या गोवा येथे होणाऱ्या नॅशनल गेम साठी जोरदार सराव करीत असून टोकियो येथे २०२० मध्ये होणाºया आॅलम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे.
भिवंडी च्या दुगाड फाटा येथील शालेय जीवनात खोखो सह अन्य खेळात तरबेज असलेल्या मनाली ची कुस्तीसाठी असलेली शरीरयष्टी पाहता शिक्षकांनी तिला कुस्तीकडे वळण्याचा सल्ला दिला. आईही शालेय जीवनात एक चांगली खेळाडू असल्याने तिने होकार दर्शविला आणि ८ वी पासून कुस्तीपटूचा तिचा प्रवास सुरू झाला. नवसमाज विद्यामंदिर, मानिवली (भिवंडी) येथून पुढे तिने कुस्तीच्या चांगल्या प्रशिक्षणासाठी तिने पुणे गाठले. १२ वी पर्यंतचा अभ्यास करून आंतरराष्ट्रीय कुस्ती मधील पंच असलेल्या दिनेश गुंड सरांच्या मार्गदर्शनाखाली ती नवनवीन बारकावे शिकू लागली. ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी मधून प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धेत आपला ठसा उमटविल्या नंतर यवतमाळ येथे झालेल्या १९ वर्षीय ६७ किलोच्या स्पर्धेत तिने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. नंतर गुजरात मधील सुरत येथे झालेल्या राजीव गांधी खेळ अभियान स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले. तर जम्मू काश्मीर येथे झालेल्या सब ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत तिने चांगलीच छाप पाडली.
चांगली कुस्तीपटू होण्याचे आई वडिलांच स्वप्न उराशी बाळगून ती आपली वाटचाल करीत असतांना तिला स्पर्धेत अपघात झाला आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बनण्याचे स्वप्न भंग पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. तिच्या पायावर कराव्या लागणाºया शस्त्रक्रियेसाठी लागणाºया मोठ्या खर्चाचे ओझे एक साध्या पतपेढीत कामाला असणाºया तिच्या आईला शक्य नव्हते. मनाली सोबत असणाºया अन्य दोन मुलींच्या शिक्षणाचा खर्च ही डोक्यावर होता. अशावेळी झडपोली (विक्रमगड) येथील जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांना हे समजताच त्यांनी मनालीच्या आईची भेट घेत तिचे पालकत्वच स्विकारले. तिच्या शास्त्रक्रिये बरोबरच तिच्या महागड्या आहाराचा, स्पर्धेतील साहित्याचा सर्व खर्च सध्या सांबरे स्वत: करीत आहेत.
सध्या मनाली सोबत तिची लहान बहीण गौरी ही वारजे (पुणे) येथील नामांकित सह्याद्री तालमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. मनाली व गौरी जाधव आज जिजाऊ स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या आयकॉन खेळाडू म्हणून खेळत आहे. आत्ताच झालेल्या महाराष्ट्र झी दंगल या स्पर्धेत सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने आपली चमक दाखवून दिली. ठाणे महापौर कुस्ती स्पर्धेत ६८ किलो वजनी गटात प्रथम क्र मांक तर तिची बहिण गौरी जाधवने ६२ किलो वजनी गटात प्रथम क्र मांक मिळवला आहे. सध्या मनाली २०१९ मध्ये होणाºया सिनिअर नॅशनल स्पर्धेची जोरदार तयारी करीत असून ही स्पर्धा जिंकून इंडिया कॅम्प सहभाग,आशिया ट्रायल स्पर्धेत विजयी होत थेट २०२० मध्ये टोकियो येथे होणाºया आॅलम्पिक मध्ये सुवर्णपदकला गवसणी घालण्यासाठी मनाली विजय वराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या कसून सराव करीत आहे.
माझ्या अपघातानंतर माझी कारकीर्द संपुष्टात आल्याच्या भीतीने मी ग्रासले असताना निलेश सांबरेंनी "तू फक्त लढ" ह्या प्रेरणेने मी आज आॅलिम्पक पदक जिंकण्याचे स्वप्न पाहू शकली.
- मनाली जाधव,
राज्यस्तरीय कुस्तीपटू.