घरफोड्यांचा वसईत धुमाकूळ; विरार, नालासोपारा, माणिकपूर, तुळिंज भाग टार्गेटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:05 PM2019-03-14T23:05:01+5:302019-03-14T23:05:27+5:30
वसई तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बंद घराचे दरवाजे फोडून लाखो रुपये किंमतीचे सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारून घरफोड्या करणाऱ्या चोरांचा धुमाकूळ सुरू आहे.
नालासोपारा : वसई तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बंद घराचे दरवाजे फोडून लाखो रुपये किंमतीचे सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारून घरफोड्या करणाऱ्या चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. या घरफोड्या करणाऱ्या चोरांवर अंकुश लावण्यात पालघर पोलीस अपयशी ठरले असून या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे. विरार, नालासोपारा, माणिकपूर आणि तुळींज या चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंद घरात घरफोडी झाल्याचे गुन्हे दाखल केले असून पुढील तपास करत आहे.
विरार पूर्वेकडील गीतांजली शाळेजवळील नाना नानी पार्कजवळ असलेल्या ओमसाई वेलफेअर सोसायटीच्या चाळ नंबर १ मधील रूम नंबर ६ मध्ये प्रफुल्ल रामदास पवार (३२) हे राहतात. शनिवार ते मंगळवार या दरम्यान घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरांनी दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटामधून १ लाख ५ हजार रु पये किंमतीचे साडे तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, १७ हजार रु पये किंमतीचे साडे पाच ग्राम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप, १२ हजार रु पये किंमतीचे ४ ग्राम वजनाच्या सोन्याच्या कानातील पट्या, ७ हजार ५०० रु पये किंमतीचे सोन्याच्या अंगठ्या असा एकूण १ लाख ४१ हजार ५०० रु पयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील बिलालपाडा गावातील कल्पना नरोत्तम पाटील यांच्या मालकीच्या स्वप्न साफल्य बंगल्यात सोमवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी घरफोडी करून ३० हजार रु पये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन आणि ४५ हजार रु पये रोख रक्कम असा एकूण ७५ हजारांची चोरीप्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नालासोपारा पश्चिमेकडील यशवन्त गौरव येथील सी ग्रेप्स इमारतीच्या एच/७०१ मध्ये राहणाºया योगेश्वर मोरेश्वर इस्वलकर (५१) यांच्या घरी सोमवारी दिवसाढवळ्या कोणी नसताना अज्ञात चोरांनी घरफोडी केली आहे.
चोरांनी ४५ हजार रु पये किंमतीचा दीड तोळे वजनाचा सोन्याचा हार, ४५ हजार रु पये किंमतीचे दीड तोळे वजनाचे कानातील कर्णफुले व पट्ट्या, २१ हजार रु पये किंमतीची सात ग्राम वजनाची कानातील कर्णफुले, १५ हजार रु पये किंमतीची पाच ग्राम वजनाची कानातील कर्णफुले आणि २० हजार रु पये रोख रक्कम असा एकूण १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वसई पश्चिमेकडील एव्हरशाईन येथील वंशदावन कॉम्लेक्स मधील सिल्वर ओक इमारतीच्या रूम नंबर ए/14 मध्ये राहणाºया हितेन मनोजभाई हरसोरा (३४) यांच्या घरी सोमवारी कोणी नसताना दिवसाढवळ्या चोरी झाली आहे.
बंदोबस्ताची मागणी
वसई तालुक्यातील विरार, नालासोपारा, माणिकपूर व तुळींज पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये चारांनी धुमाकुळ घातला आहे.
या विरोधात लवकरच कडक कारवाई करावी अशी मागणी नागरीकांनी केली असून संताप व्यक्त केला आहे.