वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचे विविध उपक्रम
By धीरज परब | Published: October 2, 2022 04:43 PM2022-10-02T16:43:05+5:302022-10-02T16:43:31+5:30
Police News: मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाला १ ऑक्टोबर रोजी २ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मीरा भाईंदर शहरात पोलिसांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
- धीरज परब
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाला १ ऑक्टोबर रोजी २ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मीरा भाईंदर शहरात पोलिसांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी यंदा २ रा वर्धापन दिवस १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाणार आहे . नया नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते . सुमारे सव्वा दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले . तसेच नाशामुक्ती शिबीर चे आयोजन केले होते . ५ रोजी शाळा व महाविद्यालयांना पोलीस भेटी देणार असून ७ ऑक्टोबर रोजी पोलीस संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत लांगी यांनी गुन्ह्यातील मुद्देमाल फिर्यादींना परत केला तसेच शाळा व महाविद्यालयात जाऊन त्यांना मार्गदर्शन केले . ४ ऑक्टोबर रोजी पोलीस व कुटुंबीयांची आरोग्य तपासणी व सागरी सुरक्षे बाबत मार्गदर्शन शिबीर होणार आहे.
मीरारोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह बागल यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने शनिवारी पोलीस व कुटुंबियांची आरोग्य तपासणी केली . पोलीस मित्रांचा सत्कार करण्यात आला . ३ ऑक्टबर सोमवारी महिलां विषयक कायदे मार्गदर्शन व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षे बद्दल जनजागृती केली जाणार आहे .