विक्रमगडमध्ये वर्षा मॅरेथॉनची सुसाट दौड
By Admin | Published: September 3, 2016 02:21 AM2016-09-03T02:21:41+5:302016-09-03T02:21:41+5:30
गेल्या तीन वर्र्षांपासून विक्र मगड तालुका कला क्रीडा मंडलाकडून आयोजन नीलेश सांबरे यांचा माध्यमातून विक्रमगडमध्ये यंदा पालघर जिल्हा ग्रामीण वर्षा मॅरेथॉन
विक्र मगड : गेल्या तीन वर्र्षांपासून विक्र मगड तालुका कला क्रीडा मंडलाकडून आयोजन नीलेश सांबरे यांचा माध्यमातून विक्रमगडमध्ये यंदा पालघर जिल्हा ग्रामीण वर्षा मॅरेथॉन आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यार्तून उस्फुर्त प्रतिसाद लाभल्याने या स्पर्धेत तब्बल साड ेसहा हजार धावपट्टूंनी सहभाग नोंदविला.
या मॅरेथॉनचे खास आकर्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत ललिता बाबर, स्नेहल राजपूत यांची खास उपस्थीती. तर प्रमुख पाहूण्यामधे अतिथी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, महाराष्ट्र कबड्डी असोशियंन सरचिटणीस रमेश देवाडीकर, इस्कोनचे प्रभुजी सुधीर माधव गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ठाकरे, पांडुरंग पाटिल, दिलीप आकरे, उपसभापती मधुकर खुताडेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे याचा पुढांकारातून आज त्यांची मुलगी तेजिस्वनी हिचा वाढदीवसा निमित्त विक्र मगड येथे भव्य दिव्य अशा स्वरूपाची वर्षा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमधे १० वर्षापासून ते १९ वर्षा वयोगटातील व खुल्या वयोगटातील स्पर्धकांनी मोठा सहभाग दर्शविला. या स्पर्धेमधे खुल्या गटाचा धावपट्टू मधून ज्ञानेश्वर विठ्ठल मोरघा याने प्रथम तर द्वितीय अमित भगवान माळी याने पटकवला. मुलींच्या खुला गटातून प्रथम जयश्री नारायण भुजाडे तर द्वितीय स्वाती राजेंद्र चव्हाण यानी पटकावले. १९ वयोगटातील ह.वि पाटिल शाळा चिंचघरचा दिनेश गुरुनाथ म्हात्रे या विद्यार्थ्यांने प्रथम, द्वितीय क्रमांक रोहिदास विठ्ठल मोर्घा या विद्यार्थ्यांन पटकविला. (वार्ताहर)
मॅरोथॉनमधे प्रथम व द्वितीय विजयी स्पर्धाकांविषयी सविस्तर माहिती
१० वर्ष मुले : प्रथम सूजीत रेंजड, द्वितीय सुनील वरठा
१० वर्ष मूली : प्रथम सुनीता गोंड, द्वितीय अर्चना गांगोडे
१४ वर्ष मुले : प्रथम हेमंत वाजे, प्रथम सनी वाघ
१४ वर्ष मूली : प्रथम श्रधा पारिध, द्वितीय आरती सापटा
१७ वर्ष मुले : प्रथम गणेश हरपाल,े द्वितीय अंकित भोरे
१७ वर्ष मूली : प्रथम सुष्मिता नाईक, द्वितीय रवीना भुजाडे
१९ वर्षीय मुले : प्रथम दिनेश म्हात्रे, द्वितीय रोहोदास मोर्घा
१९ वर्षीय मूली : प्रथम सोनाली घाटाल, द्वितीय दर्शना मोर
खुला गट मुले : प्रथम न्यानेश्वर मोरघा, द्वितीय अमित माली
खुला गट मूली : प्रथम जयश्री भुजाडे, द्वितीय स्वाती चव्हाण
कविता राऊत यानी माठ्यागटातील चार स्पर्धाकाना टं्रेनिग देऊन तयार करण्याचे अश्वासन दिली. तर ललिता बाबर यानी ग्रामीण भागातील स्पर्धाना स्पर्धकांचे नीलेश सांबरेनी आपले कौशल्य दाखवण्यासाठी एक स्वंतत्र व्यासपीठ दिल्याने भविष्यात ही मुले आंतरराष्ट्रीय पातळीगाठतील असा विश्वास व्यक्त केला.