स्वच्छतेत वसई ६१ व्या स्थानी, आयुक्त म्हणाले आणखी प्रयत्न करु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:34 PM2018-06-25T23:34:47+5:302018-06-25T23:34:58+5:30
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत २०१८ मध्ये राबविण्यात अलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई विरार शहर महापालिका ६१ व्या स्थानावर आली असून वर्ष २०१७ मध्ये याच महापालिकेला १३८ व्या स्थानावर समाधान मानावे लागले
वसई : स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत २०१८ मध्ये राबविण्यात अलेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात वसई विरार शहर महापालिका ६१ व्या स्थानावर आली असून वर्ष २०१७ मध्ये याच महापालिकेला १३८ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जानेवारी ते मार्च दरम्यान दशातील ४७५ शहरात एकाच वेळी पाहणी करण्यात आली होती.
दरम्यान मुंबई व ठाणे जवळील पालघर जिल्ह्यातील एकमेव असलेल्या वसई विरार महापालिकेला एकूण ४ हजार गुणांपैकी २८०४ गुण मिळाले. यादीत राज्यातील एकूण २८ शहरात १०० शहरामध्ये वसई विरार मनपा बाराव्या क्र माकांवर राहिली असून १० लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या ४ हजार शहरामध्ये वसई विरार शहर हे ७ व्या स्थानावर आहे. विषेश म्हणजे या अभियानात वसईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.
एकूण अभियान पाहणीतही वसई विरार शहर अव्वल ठरले. मात्र, सेवास्तरात ५९१ इतके कमी गुण पडल्याने शहराचा क्र मांक थोडा मागे गेला. तरीही, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बऱ्यापैकी सुधारणा झाली
आहे.
सेवा स्तर प्रक्रि येत केवळ ५९१ गुण मिळाले
देशात इंदूर, भोपाळ, चंदीगढ ही शहरे पहिल्या तीन स्थानावर आहेत. राज्यात नवी मुंबई सर्वाेत्कृष्ट ठरली. तर एकूण गुणांकनाचा विचार करता वसई विरार शहराला सेवा स्तर प्रक्रि येत एकूण १४०० गुणांपैकी केवळ ५९१ गुण मिळाले. अभियानाच्या पथकाकडून थेट पाहणी वर्गातील एकूण १२०० गुणांपैकी शहराला १०३८ गुण मिळाले.नागरिक प्रतिसाद गटातही एकूण १४०० पैकी शहराच्या खात्यात ११७५ गुण जमा झाले.गंभीर म्हणजे शहरात निघणाºया घनकचरा व्यवस्थापनाच्या गैरसोयीचा फटकाही शहराला सोसावा लागला. प्रशासनाने मागील वर्ष भरापासून वेगाने कामास सुरूवात केली. मोबाईल अॅप तयार करून काही नाविन्यपुर्ण कल्पनाही आणल्या. यामुळे क्र मांक व गुणातही सुधारणा झाली. पुढल्या वर्षी पुन्हा यात मोठी सुधारणा होऊन वसई विरार हे शहर देशात वरच्या क्र मांकावर जाईल, अशी अपेक्षा आयुक्त सतिश लोखंडे यांनी व्यक्त केली.