वसईत नारळ-निरा प्रकल्प

By Admin | Published: July 13, 2015 03:12 AM2015-07-13T03:12:56+5:302015-07-13T03:12:56+5:30

डहाणूपर्यंतची किनारपट्टी उत्पादनासाठी उपयुक्त असल्यामुळे येथे नारळाची प्रचंड लागवड करून त्यातून निरा निर्मितीचा प्रकल्प लवकरच येथे साकार होणार आहे

Vasai coconut plant | वसईत नारळ-निरा प्रकल्प

वसईत नारळ-निरा प्रकल्प

googlenewsNext

वसई : डहाणूपर्यंतची किनारपट्टी उत्पादनासाठी उपयुक्त असल्यामुळे येथे नारळाची प्रचंड लागवड करून त्यातून निरा निर्मितीचा प्रकल्प लवकरच येथे साकार होणार आहे. त्यातून मोठा रोजगारही निर्माण होणार असल्याने त्यास केंद्राचे मोठे अनुदानही लाभणार आहे. नारळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय सहकारी सोसायट्या स्थापन करून त्यांच्या महासंघाद्वारे हा प्रकल्प साकारणार आहे.
जगभरात नारळाच्या निरेला असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन तया दृष्टने वसई विरार उपप्रदेशात काय करता येईल याची पाहणी करण्यासाठी माजी आमदार डॉमनिक घोन्साल्विस व माजी महापौर नारायण मानकर यांनी नुकताच केरळचा तीन दिवसांचा दौरा केला. विशेष म्हणजे या सहकारी प्रकल्पाला केंद्र सरकारचे अनुदानदेखील मिळणार आहे.
वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरितपट्टा टिकून असून मोठ्या प्रमाणात नारळाची झाडे आहेत. या झाडांपासून पूर्वी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असे. परंतु, कालांतराने शेतकऱ्यांनी या पारंपरिक व्यवसायाकडे पाठ फिरविली. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारावर त्याचा परिणाम झाला.
सर्व शेतकऱ्यांनी पुन्हा प्रयत्न केल्यास तालुक्यात मोठ्या प्रमाणात नारळ लागवड शक्य असून रोजगारनिर्मिती शक्य होणार असल्याचे मानकर व घोन्साल्विस यांनी सांगितले.

Web Title: Vasai coconut plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.