वसई उपायुक्तांना दंडाची नोटीस
By Admin | Published: January 25, 2017 04:32 AM2017-01-25T04:32:12+5:302017-01-25T04:32:12+5:30
अनधिकृत बांधकामांसंंबंधीची माहिती लपवल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेच्या दोन उपायुक्तांना राज्य माहिती आयुक्तांनी दंड का करण्यात येऊ नये?
वसई : अनधिकृत बांधकामांसंंबंधीची माहिती लपवल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेच्या दोन उपायुक्तांना राज्य माहिती आयुक्तांनी दंड का करण्यात येऊ नये? याचा खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर अपिलकर्त्याला पाचशे रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले.
गणेश लाड यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंबंधी उपायुक्तांनी सहाय्यक आयुक्तांनी दिलेल्या लेखी आदेशाची प्रत माहिती अधिकारात महापालिकेकडून मागितली होती. मात्र, आयुक्त आणि उपायुक्तांनी वेळेत माहिती न दिल्याने लाड यांनी दुसरे अपिल केले होते. त्यावेळीही माहिती देण्यात न आल्याने लाड यांनी थेट राज्य माहिती आयुक्तांकडे दाद मागितली होती.
याप्रकरणी राज्य माहिती खंडपिठात सुनावणी घेण्यात आली होती. राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठ थँक्सी फ्रान्सिस थेकेकरा यांनी महापालिका आयुक्त व उपायुक्तांसह लाड यांची बाजू ऐकून घेतली होती. यावेळी थेकेकरा यांनी अपिलकर्त्याला माहिती न दिल्याबद्दल खडसावले. तसेच माहिती अधिकार नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा करण्याची नोटीस बजावली. त्याचबरोबर अपिलकर्त्याला माहिती मिळवण्यासाठी त्रास झाल्याबद्दल पाचशे रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)