वसई उड्डाणपुलावर वाहतूककोंडी
By admin | Published: October 16, 2016 03:35 AM2016-10-16T03:35:07+5:302016-10-16T03:35:07+5:30
तब्बल सात वर्षांनी वसईचा नवा उड्डाणपूल वाहतूकीसाठी मोकळा झाला असला तरी तांत्रिक दोषामुळे याठिकाणची वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी काम राहिल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
वसई : तब्बल सात वर्षांनी वसईचा नवा उड्डाणपूल वाहतूकीसाठी मोकळा झाला असला तरी तांत्रिक दोषामुळे याठिकाणची वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी काम राहिल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
वसई रेल्वे स्टेशनवर एकच उड्डाणपूल असल्याने वाहतूकीची कोंडी होत होती. त्यावर उपा म्हणून एमएमआरडीएने नव पूलाचे काम सुुरु केले. मात्र, नवा पूल वाहतूकीसाठी खुला होण्यास त्याब्बल सात वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. त्यातही पूलाच्या उद्घाटनाचा वाद किमान महिनाभर रंगला होता. शेवटी राजकीय वाद टोकाला गेल्याचे पाहून एमएमआरडीएने पूलाचे उद्घाटन घाईघाईत उरकून टाकले.
आता दोन्ही पूलांवरून वाहतूक सुुरु झाली असली तरी काही तांत्रिक दोष आणि त्रुटींमुळे वाहतूक कोंडीचा त्रास पुन्हा सुरु झाला आहे. वसई पश्चिमेकडून येणाऱ्या वाहनांना वसईच्या पूर्वेकडील नवघर येथे जाचे असेल तर पूल उतरल्यानंतर लगेचच मार्ग ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनांना मोठा वळसा घालून पुन्हा मागे यावे लागत आहे. पूल बांधताना या दोषाकडे दुर्लक्ष केले गेल्याने वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळाले आहे. (प्रतिनिधी)
नवघर पूर्वेकडून गोखिवरेकडे जाणारी रांग
नवा पूल जुन्या पूलाजवळ संपतो. त्याठिकाणी पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांची रांग असते. त्याच्यावेळी नवघर पूर्वेकडून गोखीवरेकडे जाणाऱ्या वाहनांची रांग असते. त्यामुळे पश्चिमेकडून येऊन नवघर पूर्वेकडे जाणाऱ्या वाहनांना मार्ग नाही. ही वाहने घुसून वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी बॅरिकेडस लावली आहेत. परिणामी नवघर पूर्वेकडे जाणसाठी वसंत नगरी येथून पुन्हा वळसा घालून माघारी यावे लागत आहे.