वसई किल्ल्याचे पावित्र्य संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 02:20 AM2018-07-20T02:20:45+5:302018-07-20T02:21:59+5:30

मराठा साम्राज्याचे चिन्ह असणा-या वसईच्या किल्ल्यामध्ये येणारे हौशी पर्यटक, प्रेमी युगुले, दारुडे व प्रि-वेडिंग कपल्सच्या धिंगाण्यामुळे दुर्ग प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

Vasai Fort has a sanctity in the valley | वसई किल्ल्याचे पावित्र्य संकटात

वसई किल्ल्याचे पावित्र्य संकटात

Next

नालासोपारा : पोर्तूगीजांच्या जुलमी अत्याचारापासून वसईकरांची मक्तता करुन रयतेला आश्वस्त करणाऱ्या नरवीर चिमाजी आप्पाच्या येथील स्मारकाचे पावित्र्य संकटात आले आहे. मराठा साम्राज्याचे चिन्ह असणा-या या किल्ल्यामध्ये येथे येणारे हौशी पर्यटक, प्रेमी युगुले, दारुडे व प्रि-वेडिंग कपल्सच्या धिंगाण्यामुळे दुर्ग प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
हा जंजिरा महाराष्ट्रातील दुर्गमित्रांसाठी व वसईकरांसाठी अभिमानाचे प्रतिक आहे. या स्मारकाचा वसई विरार महानगरपालिका अंतर्गत वेळोवेळी विविध माध्यमातून सुशोभिकरणाचा प्रयत्न सुरू असतो. वसईतील पोर्तुगीजांची जुलमी सत्ता उलथवून टिकण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पांनी वसईवर आक्र मण केले. वसईचा रणसंग्राम व मिळवलेला विजय हा हजारो मराठ्यांच्या रक्ताने लिहीला गेला आहे. त्यामूळे इतिहासात त्याला मानाचे स्थान आहे. या गोष्टीला आता तीन शतके उलटली आहेत.
मात्र, या ठिकाणी येणाºया पर्यटकांना स्मारकाचे महत्व सांगणारा व स्पष्ट नियमावली सांगणारा एकही फलक नसल्याने सध्या येथे स्वैर कारभार सुरू आहे. त्यात किल्ल्यातील इतर भागापेक्षा स्मारक परिसर स्वच्छ असल्याने प्रेमीयुगले व दारु बाजांना हे ठिकाण आयते मिळाले आहे. याला पायबंद घालण्यासाठी वसई- विरार महानगरपालिकेने या स्मारकाचे महत्त्व लक्षात घेऊन या ठिकाणी कायमस्वरूपी व योग्य गणवेश, ओळखपत्र असणारी व्यक्ती नियुक्त करणे अत्यंत गरजेचे असल्याचे दुर्गप्रेमींकडून सांगण्यात येत आहे.
शेकडो एकर परिसर असलेल्या या भूईकोट किल्ल्यात सद्या प्रि-वेडिंग छायाचित्रे नावाने सुरू असणारी नवी संस्कृती ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य नष्ट करण्यासाठी पुढे सरसावत आहे. येथील स्मारक रोज सकाळी स्थानिक मंडळींच्या व्यायामासाठी व योग साधनेसाठी उपयोगात येते. सध्या स्मारकात यासाठी कोणतीच व्यवस्था नाही.
स्मारकातील काही भागात दुर्गमित्रांच्या अभ्यासिकेची व्यवस्था, बालगोपाल वर्ग उद्यान, ढोल ताशा पथकाच्या सरावाची व सरावाच्या साधनांची व्यवस्था, अभ्यास सफरीची चर्चा-संवाद व्यवस्था, चिमाजी अप्पांच्या ऐतिहासिक वाटचालीची फलक स्वरूपात माहिती, अभ्यासकांनी तयार केलेली विशेष टिपणे नोंदी, मोडीपत्रे भाषांतरे, वसई मोहिमेतील नरवीरांच्या स्मृती जपणारी पूजनीय स्मारकशिळा किंवा स्मृतीस्तंभ, जंजिरे वसई किल्ल्याची प्रतिकृती, जंजिरे वसई किल्ल्याची थोडक्यात माहिती, स्मारकाची स्वच्छता व संरक्षण करणारे सुरक्षारक्षक, स्मारकास भेट देण्यास वेळेचे योग्य बंधन, चांगल्या सुशोभित फुलझाडांची लागवड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय व्यवस्था इत्यादी सोप्या लहान स्वरूपाच्या उपक्र मांनी नरवीर चिमाजी स्मारक प्रत्येकास हवेहवेसे आपलेसे वाटेल.
गेल्या कित्येक वर्षांपासून किल्ले वसई मोहीम परिवार व समस्त दुर्गमित्र परिवार अंतर्गत वृक्षारोपण, श्रमदान, इतिहास सफर, चर्चासत्र, नरवीरांची पुण्यतिथी, दीपोत्सव, विजयदिन अशा असंख्य उपक्र मासाठी नरवीरांच्या स्मारकात एकत्र येतात. हे स्मारक म्हणजे जंजिरे वसईच्या विजयाची अस्मिता आहे. किल्ले वसई मोहीम परिवाराने गेली एक वर्ष दर सोमवारी नियमितपणे चिमाजी अप्पा स्मारकात दिपपूजन करण्याचा उपक्र म पूर्ण केला. मात्र, इतिहासाची जाण नसणाºयांनी किल्ल्याचे पावित्र्य नष्ट करणे सुरु केले आहे.

स्थानिक दुर्गमित्र व महानगरपालिकेच्या सहकार्याने नरवीरांचे स्मारक पूजनीय ठरण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मराठ्यांच्या वसई मोहिमेच्या स्मृती जपून येणाºया पुढील पिढीस एक आदर्श निर्माण ठरू शकेल यासाठी दुर्गिमत्रांनी आता संवर्धनासाठी पूढे यायला हवे.
-डॉ. श्रीदत्त राऊत,
इतिहास अभ्यासक
व दुर्गमीत्र

Web Title: Vasai Fort has a sanctity in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.