वसईतील गोल्ड पर्ल देहविक्रय प्रकरणी दोघांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 06:10 AM2019-01-11T06:10:40+5:302019-01-11T06:10:57+5:30
वसई पश्चिम येथील दत्तानी मॉलमधील गोल्ड पर्ल स्पा सेंटरमध्ये वेशा व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली होती.
वसई : वसई पश्चिम येथील प्रसिद्ध दत्तानी मॉलमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसाय वसई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार येथे धाड टाकून वेश्या व्यवसायास प्रवृत्त केलेल्या २ तरुणींची सुटका केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यात १ महिला आरोपीचा समावेश आहे.
वसई पश्चिम येथील दत्तानी मॉलमधील गोल्ड पर्ल स्पा सेंटरमध्ये वेशा व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली होती. या ठिकाणी मुली आणून त्यांना हा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. त्यानुसार पोलिसांनी कारवाईच्या आधी २ पंचांना बोलावून पंचनामा केला आणि पोलिसांची २ गटात विभागणी केली. वसई पोलिसांनी बनावट गिºहाईक पाठवून सापळा लावला आणि वेशाव्यसायासाठी आलेल्या २ तरुणींची सुटका केली. या तरुणी पीडित असून त्यांचे वय अनुक्र मे २१ आणि २२ असे आहे.
या प्रकरणात बनावट गिºहाईकद्वारे २ हजाराची नोट दिली होती. ती नोट आरोपींकडे आढळून आल्याने पोलिसांनी चालक आणि दलालांविरोधात भारती दंडविधान संहिता कलम ३७० (3३४) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४ व ५ अन्वये (पिटा) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरज सिंग (२५) आणि प्रिया सिंग (२५) यांना अटक केली आहे. तर प्रजापती प्रसाद आणि गीता गोगरी हे दोघे फरार आहेत.
वसईतील प्रसिद्ध मॉलमध्ये अशा प्रकारची घटना घडल्यामुळे वसईत खळबळ उडाली आहे. या मॉलमध्ये अनेक मध्यमवर्गीय कुटूंब येत असल्यामुळे मॉलही आता सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. वसई रोड येथे अनेक लॉज व हॉटेलमध्ये सर्रासपणे वेशा व्यवसाय होत असतो. याबाबत स्थानिक मॉ संघटनेच्या महिला कार्यकर्त्या नेहमी आवाज उठवत असतात.
अनेकदा त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेल्या आहेत.मात्र आता वसईतील प्रसिद्ध मॉलमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणे म्हणजे धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रि या सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
९ जानेवारी रोजी अनैतिक वाहतूक शाखेला खबऱ्यांकडून सदर स्पामध्ये जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पंचनामा करून ही कारवाई केली गेली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.- राजेंद्र कांबळी,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,वसई