वसई विजयोत्सव एक दिवसात आटोपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:26 AM2018-05-01T00:26:20+5:302018-05-01T00:26:20+5:30

नरवीर चिमाजी आप्पा यांनी १६ मे १७३९ रोजी युद्ध जिंकून पोर्तुगीजांच्या जाचातून वसईचा किल्ला जिंकला व वसई मुक्त केली होती. हा दिवस ‘वसई विजयोत्सव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

Vasai Jayantasav was finished in one day | वसई विजयोत्सव एक दिवसात आटोपला

वसई विजयोत्सव एक दिवसात आटोपला

Next

पारोळ : नरवीर चिमाजी आप्पा यांनी १६ मे १७३९ रोजी युद्ध जिंकून पोर्तुगीजांच्या जाचातून वसईचा किल्ला जिंकला व वसई मुक्त केली होती. हा दिवस ‘वसई विजयोत्सव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. तीन दिवस चालणारा हा उत्सव मागील सहा वर्षापासून वसई विरार महानगरपालिका, वसई विजयोत्सव स्मारक समिती आणि वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव समिती यांच्या संयु्क्त विद्यामाने साजरा करत होता. यंदा मात्र यातून महापालिका अलिप्त असल्याने तो एकच दिवस साजरा होणार आहे.
सोमवार, ३० एप्रिल रोजी केवळ वसई विजयोत्सव स्मारक समिती आणि वसई तालुका कला-क्र ीडा महोत्सव समिती यांच्या संयु्क्त विद्यामाने संपूर्ण दिवसभर यंदाच्या २८० व्या वसई विजय दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नरवीर चिमाजी अप्पांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पुजन सकाळी ७ वाजता स्मारक समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. किल्ला सफर या विषयावर डॉ. श्रीदत्त राऊत यांचे माहितीपूर्ण व्याख्यान आयोजीत करून दुपारी ३ वाजता वज्रेश्वरी ते वसई किल्ला अशी मशाल रॅली काढण्यात आली.
या प्रसंगी आ. हितेद्र ठाकुर, आ. क्षितिज ठाकूर व आ. विलास तरे, तसेच महापौर रु पेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रीक्स, स्थायी समिती सभापती असिफ शेख या मान्यवरांनी हजेरी लावली.
विशिष्ट समूहाचे गुणगाण करणारे कुठलेच उत्सव साजरे करू नयेत, केवळ स्वातंत्र्य दिन म्हणजेच १५ आॅगस्ट हाच विजयोत्सव दिन असावा, अशी भूमिक समाजशुद्ध अभियानाचे फा. मायकल जी यांनी घेतली होती. त्यातच महापालिकांनी राष्ट्रीय सणा ंव्यतिरिक्त कोणतेही सण उत्सव साजरे करू नये असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. हा निर्णय आणि निर्माण झालेला वाद यामुळे यंदा महापालिकेने विजयोत्सवापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Vasai Jayantasav was finished in one day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.