वसई किल्ल्यातील हनुमान मंदिर @ २७८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:13 AM2017-07-31T00:13:15+5:302017-07-31T00:13:15+5:30

वसई किल्ल्याच्या दर्या दरवाजाजवळच असलेल्या हनुमान मंदिराला २७ जुलैला २७८ वर्षे पूर्ण झाली. स्वत: नरवीर चिमाजी अप्पांनी या मंदिरात कोरीव मिशा

vasai-kailalayaataila-hanaumaana-mandaira-278 | वसई किल्ल्यातील हनुमान मंदिर @ २७८

वसई किल्ल्यातील हनुमान मंदिर @ २७८

Next

वसई : वसई किल्ल्याच्या दर्या दरवाजाजवळच असलेल्या हनुमान मंदिराला २७ जुलैला २७८ वर्षे पूर्ण झाली. स्वत: नरवीर चिमाजी अप्पांनी या मंदिरात कोरीव मिशा, डोक्यावर सैनिकी मुकुट, कमरेला खंजीर, पायाखाली राक्षस, शेपटीला पिळ असलेली मानवी चेहरा असलेली हनुमानाची मुर्ती बसवली होती. 
वसई किल्ल्याच्या दर्या दरवाजाजवळच कौलारु छपरांचे अत्यंत साधे व आटोपशीर आकाराचे श्री हनुमान मंदिर आहे. या मंदिराच्या आतील भागात घुमटीयुक्त देवडीत हनुमानाची मुर्ती आहे. १६ मे १७३९ रोजी मराठ्यांनी वसई काबिज केल्यावर २७ जुलै १७३९ रोजी किल्ल्यातील दर्या दरवाजा व भुईदरवाजा याठिकाणी प्रत्येकी एक हनुमान मुर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. नरवीर चिमाजी अप्पांनी २० जुलै १७३९ रोजी माणकोजी पाथरवटाकडून हनुमानाची मूर्ती तयार करून तिची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठापना केली होती.
वसई किल्ल्यातील नागेश्वर मंदिर व वज्रेश्वरी मंदिर बांधकामाचा पायादेखिल पहिले पेशवे बाजीराव व चिमाजी अप्पा जिवंत असताना घालण्यात आला होता. 
इ.स. १७३९ ते १८१८ कालखंडाचा मराठेशाहीचा इतिहास जपणारी व पाहणारी ही गौरवमुर्ती म्हणून ओळखली जाते. किल्ल्याच्या दर्या दरवाजाचे संरक्षण करणारी हनुमानाची मुर्ती पेशवेकालीन आरमारी संघर्ष, सामर्थ्य आदी घटनांचा मूक इतिहास जपणारी आहे. किल्याच्या इतिहासाच्या साधनांमध्ये या हनुमान मुर्तीचा समावेश होतो.

Web Title: vasai-kailalayaataila-hanaumaana-mandaira-278

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.