वसई, नालासोपारा, विरार पहिल्याच पावसात जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:27 AM2019-06-29T00:27:04+5:302019-06-29T00:27:16+5:30

वसईत शुक्र वारी पहाटेपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्यावर वसई-विरार आणि नालासोपारात सखल भागात पाणी भरले असून पुन्हा एकदा वसई पाण्याखाली जाण्याची भीती आता नागरिकांना वाटते आहे.

Vasai, Nalasopara, Virar, in the first rain | वसई, नालासोपारा, विरार पहिल्याच पावसात जलमय

वसई, नालासोपारा, विरार पहिल्याच पावसात जलमय

Next

- आशिष राणे
वसई - वसईत शुक्र वारी पहाटेपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्यावर वसई-विरार आणि नालासोपारात सखल भागात पाणी भरले असून पुन्हा एकदा वसई पाण्याखाली जाण्याची भीती आता नागरिकांना वाटते आहे.
दरम्यान शुक्र वार रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने धुवाँधार वेग घेत संपूर्ण वसई विरार व नालासोपारात पालिकेसहीत नागरिकांची दैना उडवून दिली.
यामध्ये नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क, विजय नगर, आचोळे, अग्रवाल नगर, तुळींज रोड, संतोष भवन, तर पूर्वेतील धानीव बाग, सातिवली व पश्चिममेकडील निलेगाव, पाटणकर पार्क आदी परिसरात पाणी साठले आहे.
तसेच विरारमधील फुलपाडा रोड, चंदनसार आदी भागात आणि वसईतील सनसिटी, एव्हरशाईन भागात पाणी साचले आहे. एकूणच पावसाचा जोर असाच राहिला तर आणखी काही वेळेनंतर वसईत पुन्हा गतवर्षीची पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही तशी परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिका प्रशासन सज्ज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
पहिल्याच पावसात दैना; पालिकेचे आढावा सभेतील दावे फोल ठरले आहेत. वसई-विरारमध्ये शुक्र वारी रात्रीपासून कोसळणाºया धुवाँधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून पहिल्याच पावसाने पालिका प्रशासन व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्या असून, सखल भागात राहणाºया नागरिकांच्या घरात गतवर्षी सारखेच पाणी शिरले आहे. त्यामुळे महापालिकेचे दावे फोल ठरले आहेत.

महापालिका घेणार का धडा?
गतवर्षी वसई-विरार परिसरात पडलेल्या पावसाने जवळ-जवळ आठवडाभर जनजीवन विस्कळीत केले होते. यापासून धडा घेऊन यंदाच्या वर्षी पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. याची काळजी घेतल्याचा केलेला दावा व्यर्थ ठरला. महापालिकेने कोट्यवधी खर्चून निरी आणि आयआयटीचा अहवालही अनुसरला होता.

वसई विरार महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून ज्या परिसरात पाणी भरले आहे. ते काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. याउलट ज्या-ज्या परिसरात पाणी साचून आहे, तेथील नागरिकांनी महापालिकेशी संपर्क साधावा. त्या परिसरात तातडीने आपत्कालीन यंत्रणा पुरविण्यात येईल.’ जनतेने घाबरून जाऊ नये.
- बी. जी. पवार,
आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका (मुख्यालय)

Web Title: Vasai, Nalasopara, Virar, in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.