वसईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केंद्र सरकार विरोधात जोरदार निदर्शने आंदोलन; तहसीलदार उज्वला भगत यांना निवेदन सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 02:54 PM2021-05-19T14:54:08+5:302021-05-19T14:54:40+5:30
वसई सनसिटी, तहसीलदार कार्यालयाबाहेर राकप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
वसई:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे सूचनांनुसार केंद्र शासनाने गॅस, पेट्रोल, डीझेल, खते यांच्या किंमतीत केलेली भरमसाठ भाववाढ त्वरीत रद्द करणे करीता मागील चार दिवसांपासून राज्यात ठीकठिकाणी तीव्र निषेध आंदोलने सुरू आहेत
त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांच्या नेतृत्वाखाली वसईच्या सन सिटी -गास रोड रस्त्यावर सकाळी 11 वाजता केंद्र सरकार विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीं यांना वसई तहसीलदार ह्यांच्या मार्फत ही भरमसाठ केलेली भाववाढ त्वरित मागे घेण्यासाठी निवेदन देण्यात आले.
या निषेध आंदोलनात कोविड-19 महामारीच्या संदर्भात शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यात करून सनसिटी व वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी चक्क गॅस सिलेंडर ला हार घालून मोदी सरकारचा निषेध देखील करण्यात आला
यावेळी वसई विधानसभा अध्यक्ष राजेश शर्मा,महिला जिल्हाध्यक्षा आश्विनीताई गुरव,सामाजिक न्याय विभाग महिला जिल्हाध्यक्षा विद्या सरनाईक, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रहमान खान,जिल्हा उपाध्यक्ष जॉन शंकबार,युवक जिल्हाध्यक्ष योगेश पंदेरे,सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष महेंद्र लोखंडे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष मनीष परमार,युवक वसई विधानसभा अध्यक्ष रक्षित उपाध्याय,नालासोपारा विधानसभा उपाध्यक्ष रमेश परमार,नालासोपारा विधानसभा उपाध्यक्ष अमोल शिंदे, मीडिया प्रमुख श्रीधर पाटील,विद्यार्थी कोकण विभाग उपाध्यक्ष रॉबिन कुंजमोन,जयप्रकाश पाटील,राकेश परमार,हितेश परमार,अक्षय चव्हाण ,केतन पाटील,विकास झा,सचिन राजवंशी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते